Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

तुरीच्या दाण्याची भाजी / आमटी Recipe in Marathi

हिवाळ्यामध्ये तुरीचे कोवळे दाणेही बाजारात यायला लागतात. मिसळीच्या भाजीत तर हे घालतोच आपण पण या दाण्यांची आमटी फार खमंग लागते. त्यामुळे बाजारात हे दाणे दिसले की माझ्या तोंडाला पाणी सुटतं. या मोसमातले पहिले तुरीचे दाणे मला परवाच मंडईत मिळाले. म्हणून लगेचच त्यांची आमटी केली. आजची रेसिपी आहे तुरीच्या दाण्यांची भाजी किंवा तुम्ही त्याला आमटी असे सुद्धा म्हणू शकता. साहित्य – १ वाटी सोललेले तुरीचे दाणे, १ मोठा कांदा लांब पातळ चिरलेला, २ टीस्पून ओलं खोबरं, १ हिरवी मिरची, २ लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून लाल तिखट, २ टीस्पून काळा मसाला, मीठ चवीनुसार, २ टीस्पून दाण्याचं कूट (ऐच्छिक), १ टेबलस्पून तेल, ७-८ कढीपत्त्याची पानं, थोडी मोहरी, पाव टीस्पून हिंग कृती – १) एका कढईत थोडंसं तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात कांदा, लसूण आणि मिरची घाला. मध्यम आचेवर चांगलं परता. २) कांदा लालसर व्हायला लागला की त्यात तुरीचे दाणे घाला. नीट हलवा आणि झाकण घालून मंद आचेवर ठेवा. मधूनमधून हलवत रहा. ३) तुरीचे दाणे शिजत आले की ओलं खोबरं घाला आणि परता. ४) दोन मिनिटं परतून त्यात कोथिंबी...