*कडधान्याला मोड आणणे चांगले आहे का?* 📒
*********************************
कडधान्यात २० टक्के इतकी प्रथिने असल्याने त्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. किमतीच्या दृष्टीनेही ते परवडण्यासारखे असते.
म्हणूनच कडधान्यांना 'गरिबांचे मांस' असे संबोधले जाते. मुग, मटकी, चवळी, हरभरे यांची उसळ तुमच्या घरी करत असतील.
उसळ करण्यापूर्वी आई मटकी वा चवळी ओली करून मग स्वच्छ फडक्यात बांधून ठेवते. वातावरणातील परिस्थितीनुसार १६ ते ४८ तासांत या कडधान्यांना मोड येतात. मग त्याची उसळ केली जाते.
हे करणे योग्य आहे का ?
अर्थातच योग्य आहे. मोड आणल्यामुळे या कडधान्यात रायबोफ्लेव्हीनचे प्रमाण वाढते. तसेच नियासीन, 'क' व 'इ' जीवनसत्वे देखील तयार होतात.
त्यामुळे मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो. म्हणून कडधान्याला मोड आणून ती खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे.
उसळ करताना एक गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे उकडल्यानंतर उसळीतील पाणी फेकून देऊ नये. उसळीच्या रश्श्यासाठी तेच वापरावे,
कारण जीवनसत्त्वे 'इ' खेरीज वर उल्लेखलेली सर्व जीवनसत्त्वे ही पाण्यात विरघळणारी असतात मग उसळीचे पाणी फेकून दिले, तर त्याबरोबर ती फेकली जातात. साहजिकच मोड आणण्याचा काही उपयोग होणार नाही!



Comments
Post a Comment