Skip to main content

दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते?पंचकर्म म्हणजे काय?

 योग्य आहार-विहार व व्यायाम असेल तर शरीरात दोष साठत नाही.

पंचकर्माच्या मदतीने शरीरात साठलेली विषद्रव्ये, वाढलेले दोष, अनावश्‍यक किंवा मलरूप झालेले धातू काढून टाकता येतात हे खरे असले तरी मुळात असे का होते हे समजून घ्यायला हवे.



हे पण वाचा हिवाळ्यामध्ये लसुण का खावा?

दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते? वात-पित्त-कफ हे तीन दोष शरीरातील मुख्य कार्यकारी तत्त्वे असतात, शरीराची इमारत यांच्यावर उभी राहिलेली असते. शरीरात काम करण्यासाठी ज्यावेळी जो दोष आवश्‍यक असतो, त्यावेळी तो अधिक कार्यक्षम होणे, प्रमाणाने वाढणे हे आपोआप घडत असते. उदा. रात्री झोप येण्यासाठी शरीरातील कफदोष वाढावा लागतो, दुपारी जेवणानंतर पचन व्यवस्थित व्हावे यासाठी पित्ताचा प्रभाव वाढणे आवश्‍यक असते, सकाळी मल-मूत्र विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी वातदोष वाढत असतो. वात-पित्त-कफाचे असे हे चक्र अविरतपणे चालू असते. शरीरातील सर्व tकार्ये व्यवस्थित चालू राहावीत हा यामागचा मूळ उद्देश असतो. 

खाना खाने का सही तरिका - विडिओ देखे

मात्र हा निसर्गक्रम लक्षात न घेता अनियमित आचरण केले तर या दोषांचे असंतुलन होते आणि त्यामुळे शरीरात दोष साठायला सुरुवात होते. उदा. रात्री कफदोष वाढला की झोप येणे स्वाभाविक असते, मात्र झोपेकडे दुर्लक्ष करून जागरण केले तर त्यामुळे पित्तदोष व वातदोष वाढतात. दुपारी भूक लागूनही वेळेवर खाल्ले नाही किंवा भूक लागण्यापूर्वीच सोयीने खाऊन घेतले तर त्यामुळे पित्तदोषात बिघाड होतो. मलमूत्रविसर्जनाचा आवेग आला तरीही तो दाबून ठेवणे किंवा आवेग आला नसतानाही जबरदस्तीने विसर्जन करणे यामुळे वातदोष वाढत राहतो. 

Samsung Galaxy M31 Prime Edition (Iceberg Blue, 6GB RAM, 128GB Storage)

सूर्योदयापासून पुढचे चार तास कफाधिक्‍याचे असतात, म्हणून सकाळी व्यायाम, उटणे लावून गरम पाण्याने स्नान, डोळ्यात कफदोष वाढू नये म्हणून अंजन करणे वगैरे गोष्टी करायच्या असतात, जेणेकरून कफदोषाचे शमन होईल. पण हे घडले नाही तर मात्र कफदोष हळूहळू शरीरात साठू लागतो. रात्री वेळेवर न झोपण्याने दिवसा झोप आली तर त्यामुळे कफदोष तसेच पित्त दोष वाढत राहतात. थोडक्‍यात, आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या नीट सांभाळली नाही की त्यातून दोष मलरूप होऊन शरीरात साठण्याची प्रवृत्ती वाढत राहते.गुडघेदुखीची अनेक कारणं, विशेषतः अतिवापर किंवा अति शारीरिक कार्य यांच्याशी संबंधित कारणांवर स्वतःहून केलेल्या निगेला चांगला प्रतिसाद मिळतोः




एखादाच सांधा दुखणे व सगळे सांधे दुखणे असे याचे दोन प्रकार आहेत. यातील पहिला प्रकार म्हणजे एखादा सांधा दुखण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याचे दिसते. घोटा दुखणे वा गुडघे दुखणे, मान वा कंबर दुखणे अशा सर्व तक्रारी वाताने त्या त्या ठिकाणी बस्तान बसविल्याच्या निदर्शक असतात. आजकाल दिवसेंदिवस कमी वयातही असा त्रास होण्याचे प्रमाण वाढताना जाणवते आहे.

हे पण वाचा- वेळेवर जेवण न केल्याचे दुसपरिणाम

सगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.

दोषांच्या 

रोजच्या रोज शरीरात ज्याप्रमाणे दोषांचे प्रमाण कमी-अधिक होत असते, तसेच ते ऋतुनुसारही बदलत असते. ऋतुपरत्वे दोषांच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत,

विडिओ बघा

चय - दोष स्वतःच्या स्थानात वाढत राहणे व साचत राहणे.

प्रकोप - दुधाला उष्णता देत असता एका मर्यादेनंतर ज्याप्रमाणे दूध उतू जाते त्याप्रमाणे स्थानात वाढलेला, साठलेला दोष शरीरात इतरत्र पसरणे.

प्रशम - प्रकुपित झालेला दोष आपोआप शांत होणे.

Computer only ₹_12k




तिन्ही दोष निरनिराळ्या ऋतूत या तीन अवस्थांमधून जातात. उदा. वातदोषाचा चय ग्रीष्म ऋतूत, प्रकोप वर्षा ऋतूत आणि प्रशम शरदात होतो; पित्तदोषाचा चय वर्षाऋतूत, प्रकोप शरदात तर शमन हेमंतात होते; कफदोषाचा चय शिशिरात, प्रकोप वसंतात तर प्रशम ग्रीष्मात होतो. "चय एव जयेत्‌ दोषः‘ म्हणजे दोष साठत असतानाच योग्य काळजी घेतली तर पुढे त्या दोषाचा प्रकोप होऊ शकत नाही. मात्र हे घडले नाही तर पुढे त्या दोषाचा प्रकोप होऊ शकत नाही. मात्र हे घडले नाही तर प्रकुपित दोष शरीराबाहेर काढून टाकणे आवश्‍यक असते, अन्यथा त्यातून अनेकविध रोगांना आमंत्रण मिळू शकते.

संधिवातात सांध्यांमध्ये वातदोष असतोच पण आमवातामध्ये या दोघांच्या जोडीला आमही असतो. म्हणूनच आमवात बरा होण्यास दुष्कर व चिवट रोग समजला जातो. यात सुरुवातीला ताप येणे, अंग जड होणे, सांधे जखडणे अशी लक्षणे असतात. क्रमाक्रमाने जखडणाऱ्या सांध्यांची संख्या व तीव्रता वाढत जाते, सांध्यांवर सूज असणे, सांधा स्पर्शाला गरम लागणे, तीव्र वेदना होणे, स्पर्शही सहन न होणे ही आमवाताची लक्षणे असतात. आमवाताचे वैशिष्ट्य म्हणजे आम ज्या सांध्यात जाईल तेथे वेदना होतात. म्हणून बऱ्याचदा आमावातात फिरत्या वेदना असतात.

हे पण वाचा- मलप्रवुत्ती किती वेळात पूर्ण झाली पाहिजे

आहार आणि पचन शरीराचा सर्व व्यापार व्यवस्थित होण्यासाठी पचन नीट होणे अत्यावश्‍यक असते. आहाराचे योग्य पचन झाले की त्यातून शरीरातील धातू तयार होतात, हे धातू जोपर्यंत आपल्या नियत प्रमाणात असतात तोपर्यंत शरीरधारणाचे काम करतात. अन्नाचे पचन झाले की त्यातून मिळणाऱ्या शक्‍तीतून शरीरातील रस-रक्‍तादी सर्व धातूंचे पोषण होते. उरलेला मलभाग शरीराबाहेर जाणे अपेक्षित असते. तरी हे शंभर टक्के घडतेच असे नाही. हा साठलेला मलसुद्धा शरीरात रोगाला कारण ठरत असतो, त्यामुळे तो वेळच्या वेळी शरीराबाहेर काढून टाकणे आवश्‍यक असते. तसेच, पचन बिघडले व त्यापाठोपाठ धातू अयोग्य स्वरूपात किंवा अति प्रमाणात तयार होऊ लागले तर ते "मलरूप‘ समजले जातात. अशा वेळी पंचकर्माच्या माध्यमातून शरीरशुद्धी करून घेणेच आवश्‍यक असते.

आहार हा सुद्धा आरोग्य किंवा अनारोग्याला कारणीभूत होऊ शकणारा मुख्य मुद्दा असतो. चरकसंहितेत हितकर किंवा अहितकर आहारामुळे काय होऊ शकते हे पुढीलप्रमाणे सांगितलेले आहे,

स्वतःच्या प्रकृतीला, ऋतुमानाला, राहणीमानाला अनुकूल आहार हा व्यक्‍तीच्या पोषणाला, आरोग्याला कारणीभूत ठरतो. मात्र अहितकर आहार अनेक रोगांचे निमित्त बनत असतो. अहितकर आहारामुळे पुढील दोष उत्पन्न होऊ शकतात,

हे पण वाचा - मोड आलेले धान्य आणि त्याचे फायदे

अहितकर आहारामुळे निर्माण होणारे दोष

अग्नीचा नाश होतो.

मनामध्ये दोष उत्पन्न होतात.

धातूंमध्ये नानाविध विकार उत्पन्न होतात. उदा. रक्‍त अशुद्ध होते. मांस-मेदधातू शिथिल होतात किंवा प्रमाणाने कमी-अधिक होतात, अस्थी ठिसूळ बनतात, मज्जा क्षीण होते, शुक्रदोष उत्पन्न होतात.

बल नष्ट होते, वर्ण बिघडतो.

इंद्रिये आपापली कामे योग्य प्रकारे करू शकत नाहीत.

या प्रकारे दोष उत्पन्न झाले की आहारात सुधारणा करणे पुरेसे नसते, तर बरोबरीने अगोदर घेतलेल्या अहितकर आहाराचा शरीरावर झालेला दुष्परिणाम काढून टाकण्यासाठी पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी करून घेणे आवश्‍यक असते.

आरोग्य हा सात्म्यज भाव समजला जातो म्हणजे जन्मापूर्वी आई-वडिलांनी त्यांच्या आरोग्यरक्षणासाठी घेतलेली काळजी आणि जन्मानंतर प्रत्यक्ष त्या व्यक्‍तीने स्वतः आरोग्यप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न यांच्या समन्वयातून निरोगी राहता येणे शक्‍य असते. आयुर्वेदीय जीवनशैली स्वीकारली, आयुर्वेदिक मार्गदर्शनाचा वेळोवेळी उपयोग करून घेतला तर आरोग्य बिघडणार नाही हे नक्की.

आयुर्वेदातील बरेचसे मार्गदर्शन पारंपरिक मार्गाने तसेच संस्कृतीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचलेले दिसते. उदा. बाळंतिणीला शेक, धुरी देणे, नवजात बालकाला बाळगुटी देणे, तेल लावणे, पावसाळ्यामध्ये आहार जपून करणे, गर्भवतीने डोहाळे पुरविणे अशा किती तरी गोष्टी सर्वांच्या माहितीच्या असतात, पण वेळ नाही म्हणून किंवा त्यांचे महत्त्व समजले नाही म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, तर त्यामुळे रोगाला आमंत्रण मिळतेच. या संदर्भातील एक आठवणीत राहून गेलेली केस या प्रमाणे,



वात प्रकृतीची लक्षणे - वात प्रकृतीच्या व्यक्ती शिडशिडीत व कृश शरीरयष्टीच्या असतात. यांच्या शरीरात कोरडेपणा अधिक असून केस, नखे, त्वचा ही रुक्ष असतात. या व्यक्ती अतिशय वाचाळ असल्याने सतत बडबड करत असतात. अधिक काळ शांत व स्वस्थ बसणे त्यांना जमत नाही. सतत काहीतरी करत राहण्याची प्रवृत्ती असते. परंतुु एकाग्रता कमी असल्याने एका कामात फार वेळ त्यांचे लक्ष लागत नाही व झोपेत स्वप्ने अधिक दिसतात.


हे पण वाचा -पोटातील गॅस साठी मेथीचे दाणे आणि त्याचे फायदे

घ्यावयाची काळजी (वात) :- वात प्रकृतीच्या व्यक्तींना संधिवात, निद्रानाश, दमा तसेच वाताचे विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे यांनी आहारात हरभरा, वालाच्या शेंगा, बटाटे, कडधान्ये आदी वात वाढवणारे पदार्थ खाऊ नयेत. जेवणात तेल, तूप, लोणी अशा स्निग्ध पदार्थांचा वापर करावा. अंगाला नियमित तीळ तेलाने अभ्यंग करावे. सतत प्रवास, अतिश्रम टाळावेत. पावसाळ्याच्या दिवसांत पंचकर्मापैकी बस्ती हे कर्म अवश्य करून घ्यावे.

पित्त प्रकृतीची लक्षणे - पित्त प्रकृतीच्या व्यक्ती गो-यापान, धारदार नाकाच्या व सुंदर असतात. शरीरय ष्ट्र ी मध्यम स्वरूपाची असून केस कमी असतात. लवकर केस गळणे किंवा अकाली केस पांढरे होणे अशी लक्षणे यांच्यामध्ये दिसून येतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना वारंवार भूक लागते. थंड पदार्थ याच्या विशेष आवडीचे असतात. या व्यक्ती अतिशय बुद्धिमान व अभिमानी असतात. यांना राग फार लवकर येतो. यांचे बोलणे मुद्देसूद व प्रभावी असते.

घ्यावयाची काळजी (पित्त) : पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना आम्लपित्त, केसांच्या समस्या, उष्णतेचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या व्यक्तींनी तिखट, आंबट व मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खावेत. गोड, तुरट व कडू चवीचे पदार्थ खाण्यात असावेत. गाईच्या दूध व तुपाचा आहारात समावेश करावा. आवळा, डाळिंब, अंजीर ही फळे खावीत. रात्री जागरण, उन्हात हिंडणे, चिडणे टाळावे. शरद ऋतूत विरेचन कर्म करून घेणे यांच्यासाठी हितकारक ठरते.

कफ प्रवृत्तीची लक्षणे - कफ प्रवृत्तीच्या व्यक्ती ध ष्ट्र पु ष्ट्र व सुदृढ असतात. काळेभोर केस, गोल चेहरा, पु ष्ट्र शरीरामुळे हे लोक पटकन नजरेत भरतात. यांचे बल, सहनशक्ती उत्तम असते. परंतु यांच्या सर्वच हालचालींमध्ये एक प्रकारचा मंदपणा असतो. निवांत काम करण्याकडे यांचा कल असतो. गती कमी असली तरी दीर्घकाळापर्यंत एकाग्रचित्ताने काम करण्याची प्रवृत्ती असते. यांना फार राग येत नाही. कफ प्रवृत्तीच्या व्यक्तींना झोप मात्र अधिक येते. यांचा आवाज मधुर असतो. परंतु ते कमी बोलतात.

घ्यावयाची काळजी (कफ) :- कफ प्रवृत्तीच्या व्यक्तींना मधुमेह, स्थूलता, मुतखडा व कफाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कफ प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गोड पदार्थ खाणे टाळावे. दूध, दही व त्यापासून निर्मित पदार्थांचे सेवन करू नये. नियमित व्यायाम करावा.


आहारीय व विहारीय घटकांचा या वातावर परिणाम होत असतो. जसे की हरभरा, आइस्क्रीम यांना कॅलरी, फॅट, प्रोटीन या भाषेत पाहणे हे एक शास्त्र आहे व याच घटकांना हरभऱ्याने वात वाढतो, आइस्क्रीममुळे कफ वाढतो या भाषेत पाहणे हे एक शास्त्र आहे. दोन्ही शास्त्रे आपापल्या जागी बरोबर आहेत. मग हा ‘वात’ म्हणजे नक्की काय हेच प्रथम आपण जाणून घेऊ. आयुर्वेदात ‘शूलं नास्ति विना वातात.’ असे सूत्र आले आहे. म्हणजे कोणतेही दुखणे वाताशिवाय असू शकत नाही आणि हलक्या हाताने दाबले तरी माणसाचे अंग दुखणे, डोके दुखणे, सांधे दुखणे थांबते. म्हणजे आपण दिलेल्या बाहेरील दाबाचा (प्रेशर) आणि आतील दाबाचा काही तरी संबंध असला पाहिजे. तर सोप्या भाषेत वाढलेला ‘वात’ म्हणजे तुमच्या शरीरावर आलेला अनावश्यक ‘ताण’ होय. मग आपल्या लक्षात येईल की, आपण किती वेळा अनावश्यक ताण घेत असतो आणि त्यामुळे आपला वात वाढत असतो. अगदी सकाळी उठण्याचासुद्धा आपल्याला ताण जाणवतो. मग प्रेशर देऊन मलविसर्जन करतो, हवेचे बदललेला दाबसुद्धा आपल्या शरीरातील वात वाढवायला कारणीभूत ठरते त्यामुळे दुखणे वाढते. म्हणून वेदनाशामक गाोळ्या घेऊन हे दुखणे मेंदूला कळविणे थांबवू नका. ज्यामुळे दुखणे आहे असा वात प्रथम कमी करा. यासाठी वातूळ पदार्थ जसे की पोहे, हरभरा डाळीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, बेकरी पदार्थ खाण्याचे टाळा.

पावसाळ्यात शरीराला तेलाची गरज असते म्हणून आहारात नियमित तेल-तुपाचे प्रमाण वाढवा आणि सर्वात सुंदर उपाय म्हणजे अंगाला नियमित तेल चोळणे अथवा एखाद्या वैद्याकडे जाऊन शास्त्रोक्त पंचकर्म करणे हा होय. यातील ‘बस्ती’ ही चिकित्सा वातासाठी श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. पावसाळा हा पंचकार्मातील बस्ती करण्यासाठी सर्वात योग्य काळ. कारण याच काळात वाताचे आजार वाढत असतात. स्नेहन, स्वेदन व बस्ती आपल्या शरीरातील वाढलेला ‘वात’ कमी करतात, यामुळे अनावश्यक ताण कमी होतो व दुखणे बरे होते. दररोज स्नेहनाच्या निमित्ताने वाटीभर अंगात जिरलेले तेल हळूहळू वाताचे शमन करते. बस्तीमुळे वाताबरोबरच शरीराचीही शुद्धी होते. आपण मात्र काही तपासणी करायची असेल की लगेच तयार होतो. एक्स रे, सिटी स्कॅन इत्यादीमध्ये न दिसणारा ‘वात’ शोधतो पण त्या शरीरासाठी तो वात कमी करण्यासाठी काही करत नाही

Comments

  1. फारच सुंदर व समर्पक पणे विषयावर अगदी सोप्या शब्दात सविस्तरपणे व सोदाहरण स्पष्टीकरण केले आहे, खरंच आयुर्वेद हे शारीरिक व मानसिक क्षमता वाढवण्यासाठी च योग्य आहे

    ReplyDelete
  2. छान माहिती मिळाली.वाचुन आनंद झाला. व पंचकर्म करून घ्यावं अशी इच्छा व्यक्त झाली 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी? लसूण चे फायदे

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी*? लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. लसूण अन्नाचा स्वाद वाढवते. पण याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहे. आयुर्वेदात देखील लसणीचे महत्व सांगितले आहे. कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा.  कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे. लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते. हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.  लसणीमधील पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च ...

वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम

 *वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम*  खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे. ♦ *हे आहेत दुष्परिणाम* ♦ ✅ 1. *वजन वाढते*  वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते. यामु फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. ✅ *2. चक्कर येणे*   भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते. ✅ *3. तणाव *  भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो. 22 ✅ *4. अन्य आजार *  वजन घटवायचे असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतराने खात राहा. अन्यथा विविध आजार शरीरात शिरकाव करू शकतात. ✅ *5. लठ्ठपणावर नियंत्रण *  योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा. ✅ *6.मेंदूचे कार्य*  ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प...