Skip to main content

वारंवार कुरूप होत असल्यास आयुर्वेदिक उपचार.


पूर्वीच्या काळी लोक अनवाणी पायांनी रानावनात फिरायचे, त्यामुळे पायात काटा मोडणे हे जणू नेहमीचेच असायचे. माझे बालपणसुद्धा खेडेगावात गेले. कित्येकदा पायात काटे मोडले, कुरूप झाले तरी कधी कोणत्या दवाखान्यात जायची वेळ नाही पडली किंवा कधी साधी corn cap  सुद्धा नाही वापरली. आमची आज्जी पायात काटा मोडल्यास बाभळीचा पाला आणून तव्यावर परतून पायाला बांधून ठेवायची, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आराम मिळायचा. 



कुरूप झाले की त्यावर गुळाचा चटका द्यायची किंवा खापराच्या तुकडय़ाने चटका द्यायची. ते कायमचे बरे व्हायचे. कुरूप यालाच आयुर्वेदात ‘कदर’ असे म्हणतात. तसे पाहायला हा एक क्षुद्र रोग असला तरी कित्येक जणांना याने अगदी हैराण केले आहे. काहींनी तर यापासून सुटका मिळविण्यासाठी शस्त्रक्रियासुद्धा केल्या आहेत. दहा दिवस ते महिना महिना विश्रांती घेतली आहे. 


लसुण खाण्याचे फायदे आणि नुकसान-आणखी वाचा


तरीपण याच्या त्रासापासून अनेकांची सुटका झाली नाही. आजकाल लोकांच्या पायात काटा मोडत नाही, पण कुरूप मात्र काही जणांना होते. कारण आजकाल सतत शूज-सॉक्समध्ये सुरक्षित असणाऱ्या पायांत नकळत कधी देवदर्शनाला जातानासुद्धा हळूच एखादा बारीक खडा रुततो व तो हळूहळू कुरूप तयार करतो. 



खरं तर कुरूप ही आपल्या शरीराने तो खडा अजून आत जाऊ  नये म्हणून त्याभोवती निर्माण केलेल्या जाड पेशीचा थरच असतो. मात्र त्यांची वाढ अधिक होऊ  लागली की, मग त्या वेदना देऊ  लागतात. बाजारात मिळणारे Salicylic Acid किंवा कॉर्न कॅपच्या पट्टीने ते फक्त अजून नरम पडते व हळूहळू जळू लागते. छोटे कुरूप असल्यास बऱ्याचदा याने बरे होतेही, मात्र ज्यांना जास्त कुरुप आहेत त्यांचे काही केल्या या उपचारांनी बरे होत नाही.


हे ही वाचा - शोच/संडास साफ होण्यासाठी उपाय 


 त्यासाठी पोटातून औषधेपण घ्यावी लागतात. कारण काहीवेळा कुरूप हे शरीरातील मांस धातूच्या विकृतीमुळेसुद्धा होते. त्यामुळे बऱ्याचदा ते होण्यामागील कारण शोधून चिकित्सा द्यावी लागते. आमच्याकडे अनेक कुरूप झालेले रुग्ण येतात. त्यांना आम्ही गूळ, खापराच्या चटक्याबरोबरच आयुर्वेद शास्त्रोक्त अग्निकर्म चिकित्साही करतो. यामध्ये सुवर्ण, ताम्र, लोह अथवा पंचधातूच्या शलाका वापरल्या जातात. अग्निकर्माने कुरूप झालेली जागा जळून जाते. एक-दोन वेळा अग्निकर्म केल्यास कुरूप कायमचे बरे होते. अग्निकर्म केल्यावर अवघ्या दोन मिनिटांत रुग्ण स्वत:च्या पायांवर चालू शकतो. 



पाच मिनिटांत हमखास व कायमस्वरूपी कुरूपापासून मुक्ती देणारी ही चिकित्सासुद्धा काळाच्या ओघात लोप पावू लागली आहे. लक्षात ठेवा आजकाल शरीरातील विकृत पेशी जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्वाट्री, रेडीएशन या चिकित्सेच्या मागील तत्त्वेसुद्धा हीच आहेत. फक्त काळानुसार साधने बदलली. म्हणून तर आपल्या समृद्ध परंपरेतील अशा काही अघोरी वाटणाऱ्या व लोप पावू लागलेल्या चिकित्सा पद्धतीतील शास्त्र आपण प्रथम समजून घ्यायला हवे.






मोडून कुरूप झाले असेल तर ते कापून काढावे लागते. दुकानात कुरूप घालवण्यासाठी खास मलमपट्टया (कॉर्न कॅप) मिळतात त्या वापराव्यात. वारंवार कुरूप होत असल्यास होमिओपथीचे उपचार करावे. आयुर्वेद चिकित्सेत यासाठी 'दहन' (कुरूप भाजणे) हा उपाय सुचवतात. यासाठी गुळाचा चटका दिला जातो.


पोटातील गॅस दूर करायला फक्त हे करावे - आणखी वाचा



कुरूप म्हणजे शरीराबाहेरील कुठलीही कृत्रिम वस्तू (फॉरीन बॉडी) शरीरात रुतून बसणे. उदा. काटा, काच,रेती, कुस (लाकडाचा) लोखंटी बर इत्यादी. शरीर अशा प्रकारची बाहेरील वस्तू कधीही स्वीकारत नाही. त्वचेद्वारे अशी बाहेरील वस्तू एका घट्ट आवरणाने पकडून ठेवली जाते व त्याला शरीरात जाण्यापासून प्रतिबंध केला जातो. कुरूप -कॉर्न ही जणू शरीराला वॉर्निंग देण्याची त्वचेची भाषा आहे. जणू त्वचा सांगत असते की ही फॉरीन बॉडी त्वरित काढून टाका. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार खोलवरचे कॉर्न काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते, परंतु हा उपचार खर्चीक तर असतोच व वेदनादायकदेखील. 


शस्त्रक्रियेमध्ये कुरूपासोबत काही मांसल भागदेखील काढला जातो व नंतर जखम भरण्यासाठी टाकेदेखील द्यावे लागतात. या सर्व प्रक्रियेदरम्यान रुग्णास क्वचित कामकाजापासून सुटीदेखील घ्यावी लागते. जर कुरूप एकापेक्षा अधिक असतील तर खर्च व त्रास देखील अधिकच असतो. वरवरच्या कॉर्नसाठी कॉर्नकेपचादेखील शक्यतो उपयोग होत नाही. बरेच जण घरीच कुरूप ब्लेडने कापणे, सुईने टोकरणे, गरम सळईने चटके देणे, असे त्रासदायक उपाय करतात, परंतु त्याने काही फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होते. शिवाय कायमची दुखापत होण्याची जास्त शक्यता असते व कुरूप परत जैसे थे !




होमिओपॅथी या उपचार पद्धतीने अशी गुणकारी औषधी उपलब्ध आहेत की ज्याने हातही न लावता केवळ पोटात औषधी देऊनच कॉर्न काढले जातात. या औषधीमुळे काही दिवसातच कॉर्न आपोआप गळून पडतात. ही औषधी अत्यंत सुरक्षित व साइडइफेक्ट्स रहित असतात. त्यामुळेच लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वासाठीच उपयुक्त ठरतात. काही औषधी ही तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांकडूनच घ्यावीत.

Comments

Popular posts from this blog

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी? लसूण चे फायदे

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी*? लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. लसूण अन्नाचा स्वाद वाढवते. पण याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहे. आयुर्वेदात देखील लसणीचे महत्व सांगितले आहे. कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा.  कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे. लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते. हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.  लसणीमधील पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च ...

वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम

 *वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम*  खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे. ♦ *हे आहेत दुष्परिणाम* ♦ ✅ 1. *वजन वाढते*  वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते. यामु फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. ✅ *2. चक्कर येणे*   भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते. ✅ *3. तणाव *  भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो. 22 ✅ *4. अन्य आजार *  वजन घटवायचे असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतराने खात राहा. अन्यथा विविध आजार शरीरात शिरकाव करू शकतात. ✅ *5. लठ्ठपणावर नियंत्रण *  योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा. ✅ *6.मेंदूचे कार्य*  ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प...

दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते?पंचकर्म म्हणजे काय?

 योग्य आहार-विहार व व्यायाम असेल तर शरीरात दोष साठत नाही. पंचकर्माच्या मदतीने शरीरात साठलेली विषद्रव्ये, वाढलेले दोष, अनावश्‍यक किंवा मलरूप झालेले धातू काढून टाकता येतात हे खरे असले तरी मुळात असे का होते हे समजून घ्यायला हवे. आयुर्वेदिक विषयी माहिती-  किडनी स्टोन झाला असल्यास हे पदार्थ खाऊ नये हे पण वाचा  हिवाळ्यामध्ये लसुण का खावा? दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते? वात-पित्त-कफ हे तीन दोष शरीरातील मुख्य कार्यकारी तत्त्वे असतात, शरीराची इमारत यांच्यावर उभी राहिलेली असते. शरीरात काम करण्यासाठी ज्यावेळी जो दोष आवश्‍यक असतो, त्यावेळी तो अधिक कार्यक्षम होणे, प्रमाणाने वाढणे हे आपोआप घडत असते. उदा. रात्री झोप येण्यासाठी शरीरातील कफदोष वाढावा लागतो, दुपारी जेवणानंतर पचन व्यवस्थित व्हावे यासाठी पित्ताचा प्रभाव वाढणे आवश्‍यक असते, सकाळी मल-मूत्र विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी वातदोष वाढत असतो. वात-पित्त-कफाचे असे हे चक्र अविरतपणे चालू असते. शरीरातील सर्व tकार्ये व्यवस्थित चालू राहावीत हा यामागचा मूळ उद्देश असतो.  खाना खाने का सही तरिका - विडिओ देखे मात्र हा निसर्गक्रम ल...