बध्दकोष्ठ होण्यामागची कारणं
जेवणात तंतुमय पदार्थांचा अभाव.
व्यायामाचा अभाव- सर्व भौतिक सुख सोयींमुळे सध्या शारीरिक हालचाली फारच कमी प्रमाणात होतात. त्यामुळे त्याला रोज नियमित व्यायामाची जोड देणं आवश्यक आहे. शरीरास व्यायाम नसल्याने पोटातील पचलेलं/न पचलेलं अन्न पुढे सरकायला खूपच वेळ लागतो व बध्दकोष्ठ संभवतो.
ताण तणाव- सध्याच्या सुपरफास्ट लाइफस्टाइलमुळे निर्माण होणाऱ्या ताणामुळे शरीरात संप्रेरकं (harmones) स्रवली जातात, ज्यांचा परिणाम आतड्यांच्या कार्यावर होऊन त्या मंदावतात. त्यामुळे पोटात गच्च वाटणं, ढेकर येणं, पोटात गॅसमुळे गुरगुर आवाज येणं, इ. तक्रारी सुरु होतात.
गरोदरपण- यामध्ये पोटातील जागा ही वाढत्या बाळाने व गर्भाशयाने व्यापली गेलेली असल्याने आतड्याच्या कामात थोडा अडथळा उत्पन्न होतो व वरील सर्व गोष्टींमुळे बध्दकोष्ठाचा त्रास सुरु होतो.
शौचाचा वेग रोखणं- केव्हा-केव्हा काही अपरिहार्य कारणांमुळे एखादी व्यक्ती शौचाची भावना रोखून धरते तेव्हा त्यामुळे निर्माण झालेला संडास कडक होऊन बध्दकोष्ठता होऊ शकते.
गुदद्वाराच्या जागी असलेले मोड किंवा फिशर्स किंवा पाइल्स- यामुळे शौच करताना दुखतं वा रक्तस्राव होतो व त्यामुळे शौच थांबवली जाते व बध्दकोष्ठता होते.
काही औषधांचे दुष्परीणाम (Side effects)- अॅसिडीटीसाठी घेण्यात येणारी औषधं, हार्टच्या, रक्तदाबाच्या तक्रारीसाठी घेण्यात येणारी काही औषधं, मधुमेहाची औषधं, कॅल्शिअम कार्बोनेटच्या गोळ्या, रक्तवाढीसाठी देण्यात येणारी काही टॉनिक यामुळे बध्दकोष्ठाचा त्रास होतो.
वयोमानाप्रमाणे किंवा मज्जू संस्थेच्या आजारामुळे आतड्याची हालचाल कमी होते व शौच पुढे सरकत नाही.
बद्धकोष्ठता कसे टाळावे
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी खालील उपाय केले जाऊ शकतात:
जास्त तंतू म्हणजेच फायबर प्रमाणात असलेले आहार घ्या. त्याचे चांगले स्रोत म्हणजे फळे, भाजीपाला, शेंगा, आणि व्होल ग्रेन ब्रेड आणि अन्नधान्य (विशेषतः ब्रान ).
भरपूर पाणी आणि इतर द्रवपदार्थ प्या. फायबर आणि पाणी एकत्र हे नियमितपणे आपल्या आतदड्यांचा हालचाल चालू ठेवतात.
कॅफिन टाळा, चहा आणि कॉफी मुळे डिहाइड्रेशन होऊ शकते.
दूध चा वापर कमी करा खाण्यात. डेअरी उत्पादने काही लोकांमध्ये बद्धकोष्ठता उत्पन्न करू शकतात.
नियमित व्यायाम करा. दिवसाचे कमीतकमी 30 मिनिटे काहीनाकाही सक्रिय कार्य करा असे आठवड्यातील बहुतेक दिवस करा.
आपणास जर वेग आला असेल मल त्यागाचा तर बाथरूम ला जरूर जा त्यास थांबवू नका.
जुलाब म्हणजे नेमके काय?
मलप्रवृत्ती वारंवार होणे किंवा मळ पातळ असतो, तेव्हा जुलाब झाले असे म्हटले जाते. मनुष्य निरोगी असेल, तर मळाचा घट्टपणा ठरावीक असतो. मलविसर्जन दिवसातून बहुधा
एकदा किंवा दोनदा होते. मात्र जुलाब झाल्यावर मळाचा पातळपणा वाढतो. दिवसातून अनेकदा मलविसर्जनासाठी जावे लागते.
कारणे
जुलाब हा जंतुसंसर्गामुळे होणारा विकार आहे. हा विकार खालील प्रकारांमुळे होतो.
- बॅक्टेरिया
- विषाणू
- जास्त प्रमाणात मसाल्याचे सेवण
- अपुरी झोप
- अमिबासारखे जंतू
न उकळलेले पाणी किंवा न शिजवलेले पदार्थ यांच्यातून हे जीवजंतू आपल्या शरीरात जातात. उकळलेल्या किंवा शिजवलेल्या अन्नात कधीही विषाणू राहत नाही. त्यामुळे न उकळलेले पाणी आणि न शिजवलेले पदार्थ बहुधा टाळावेच.
पचण्यास जड, तेलकट, मसालेदार या पदार्थाच्या अतिसेवनानेही जुलाब होतात. तिखट पदार्थाच्या अतिसेवनानेही हा विकार होतो. एकमेकांना प्रतिकूल असणारे पदार्थ खाल्ल्यानेही जुलाब होतात.
आपल्या शरीरातही जंतू असतात. त्यांना संधिसाधू जंतू म्हणता येईल. अनेकदा घशात किंवा पोटामध्ये आतडय़ात हे जंतू असतात. संधी मिळाल्यावर हे जंतू डोके वर काढतात. अतिश्रम, उन्हात अधिक वेळ फिरणे, अस्वच्छ अन्नपदार्थ खाणे, खाण्याच्या वेळा न पाळणे आदी अनेक कारणांचा हे संधिसाधू जंतू फायदा घेतात आणि जुलाबाला आयतेच निमंत्रण मिळते.
अस्वच्छता या कारणामुळेही हा विकार होऊ शकतो. न झाकलेले अन्नपदार्थ खाल्ल्यास किंवा अन्नपदार्थ बनविताना स्वयंपाकघरात अस्वच्छता असल्यास किंवा ज्या भांडय़ांमधून आपण जेवणार आहोत, ती अस्वच्छ असल्यास जुलाब होण्यास कारण मिळते.
लक्षणे :
- पोटात दुखणे
- वारंवार शौचास होणे
- ताप येणे
- शौचातून आव जाणे
- कधीकधी शौचातून रक्तही जाते
- प्रतिकारशक्ती कमी होणे
- शौचात पातळ होणे
- भूक मंदावणे
- बैचेन वाटणे
उपाय
जुलाब झाल्यावर बऱ्याचदा घरगुती उपाय केले जातात आणि डॉक्टरकडे जाणे टाळले जाते. जर या विकारातून पूर्णपणे बरे व्हायचे असेल, तर डॉक्टरकडे जाणे अत्यंत गरजेचे आहे.
जुलाब झाल्यानंतर संधिसाधू जंतूंना आयती संधी मिळते आणि हा आजार बळावतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच उपाययोजना कराव्यात. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
वारंवार पाणी पिणे आवश्यक. जुलाब झाल्यावर शरीरात पुरेसे पाणी असणे आवश्यक असते.
प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. अतिश्रम टाळाच.
घरात, स्वयंपाकघरात पुरेशी स्वच्छता असावी. रुग्णानेही स्वच्छता बाळगणे आवश्यक.
काय खावे, काय नको
जुलाब झाल्यानंतर हलका आहार घ्यावा. उदा. ताकभात, मुगाची खिचडी.
तळलेले, तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. उघडय़ावरील पदार्थ तर बिलकूल खाऊ नये.

Comments
Post a Comment