तुम्हाला सतत दातदुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला दात दुखीची कारणे देखील माहीत हवी. म्हणून दात दुखींच्या कारणांपासून सुरुवात करुया. म्हणजे तुम्हाला तुमच्या दात दुखीचे कारण कळायला मदत होईल.
दात किडणे
दातांना लागलेली कीड
तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे कण जर दातांमध्ये तसेच राहिले तर ते अन्न तिथेच कुजते.त्यामुळे तुमच्या दातांना कीड लागायला सुरुवात होते. दातांना कीड लागण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर तुमच्या दातांना ती आतपर्यंत कोरत जाते. तुमचे दात सुरुवातीला खड्डे पडल्यासारखे वाटू लागतात. पण त्यानंतर त्यावर एक काळा थर साचत राहतो. म्हणूनच लहान मुलांचे दात किडल्यानंतर त्यांना तू चॉकलेट खातोस का? असे मुद्दाम विचारले जाते. मुळात दातांची कीड खोलपर्यंत गेल्यानंतर त्याचा रंग चॉकलेटी आणि मग काळा होऊ लागतो. कीड लागल्यानंतर तुमच्या दिसण्यातच नाही तर तुम्हाला दात दुखीचा त्रास देखील सुरु होतो.
वाचा - आयुर्वेदानुसार आपले जेवण कसे असावे.
नाजूक दात
आईस्क्रिम खाल्ल्यामुळे दातांना बसणाऱ्या झिणझिण्या
अनेकदा दात चांगले असूनही ते गरम किंवा थंड खाल्ल्यामुळे दुखतात. याचे कारण तुमच्या दातांचे नाजूक असणे. जर तुमच्या शरीरात कॅल्शिअमची कमी असेल तर तुमचे दातांना सतत झिणझिण्या बसत राहतात. म्हणजे तुम्ही काहीही खाल्ले तरी तुम्हाला त्रास होऊ लागतो. हायपर सेन्सिटीव्हिटीचा त्रास अनेकांना असतो. असा त्रास होऊ लागल्यावर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर तुम्हाला दातांच्या अन्य समस्या येऊ लागतात.
हिरड्यांचे आजार
दातांना धरुन ठेवणाऱ्या हिरड्या मजबूत राहणे फारच गरजेचे असते. अनेकांना हिरड्यांचा आजार असतो. हिरड्यांच्या आजारामध्ये तुम्हाला अनेक त्रास होण्याची शक्यता असते. ज्यावेळी तुम्हाला हिरड्यांचा त्रास होऊ लागतो. त्यावेळी तुमच्या हिरड्या सुजायला लागतात. हिरड्यांना आलेली सूज पुढे जाऊन अनेक त्रासांचे कारण बनते. हिरड्या सैल पडल्यानंतर तुमच्या हिरड्यांमध्ये अन्न साचू लागते. त्यामुळे तुमच्या हिरड्यांमध्ये पू साचायला सुरुवात होते. हिरड्यांच्या आजारांमध्ये प्रामुख्याने पायोरिया आणि प्लाक साचायला सुरुवात होते. हिरड्या सैल झाल्यानंतर तुमचे दात निखळण्याची देखील शक्यता असते.
हिरड्यांमधून रक्त येणे
दातांच्या हिरड्यांमधून रक्त येणे
हिरड्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला हिरड्यांमधून रक्त येण्याचा त्रासही होऊ शकतो. तुमच्या हिरड्या स्वच्छ नसतील तर त्यामध्ये साचणारे अन्न कण तुमच्या हिरड्यांमध्ये पू साचायला सुरवात होते. हा पू जर खूप खोलपर्यंत साचला तर तुम्हाला दात दुखू लागतात. अनेकदा हिरड्यांमधून रक्तही येऊ लागते. हिरड्यांमधून रक्त येणे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष करु नका. तुमच्या दात दुखीचे हे एक कारण असू शकते.
जबड्याला सूज येणे
जबड्याला आलेली सूज
दात दुखी जर जास्त वाढली की ती तुमच्या जबड्यापर्यंत जाऊन पोहोचते. अनेकदा दात दुखीसोबत तुमचा जबडा दुखू लागतो. तुमच्या जबड्याला सूज येऊ लागते. जबड्यां ना सूज येणे दातांच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे जबड्यांच्या दुखण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका. याचे विपरित परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात.
दात किडण्याच्या अवस्था
१. या अवस्थेत कीड ही दाताच्या ‘इनॅमल’ या सर्वात बाह्य़ आवरणापुरतीच मर्यादित असते. अशा वेळी किडलेल्या दातात किंवा दाढेत छोटासा खड्डा म्हणजे ‘कॅव्हिटी’ तयार होते आणि त्यात अन्न अडकत राहते; पण वेदना होत नाहीत. दात किंवा दाढा दुखत नसल्यामुळे या प्राथमिक अवस्थेत रुग्ण दातांचा इलाजही करून घेत नाहीत.
२. यात कीड दातांच्या पुढच्या थरापर्यंत म्हणजे ‘डेंटिन’पर्यंत पोहोचते. या वेळी कॅव्हिटी मोठी झालेली असते. क्वचित दात किंवा दाढ दुखतेही. पण रुग्ण दातात अडकलेले5 अन्नाचे कण विविध प्रकाराने काढून टाकतात, त्या बाजूने खाण्याचे टाळतात. किडलेल्या दाताचा इलाज करणे या अवस्थेतही टाळलेच जाते.
३. या अवस्थेत कीड दाताच्या सर्वात आतल्या थरापर्यंत म्हणजे ‘पल्प’पर्यंत किंवा नसेपर्यत पोहोचते. दातातली कॅव्हिटी खूप मोठी झालेली असते. दात ठणकत असतो. रुग्णांना वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात आणि दातांच्या दवाखान्यात धाव घेण्याची वेळ येते.
४. आता मात्र कीड दाताच्या पल्पमधून मुळांपर्यंत पसरते. दाताच्या मुळाच्या टोकाशी जंतुसंसर्ग होऊन तिथे गळू होते. चेहऱ्याला सूज येते; क्वचित तापही येतो. दाताला असह्य़ ठणका लागतो. पूर्वी अशा अवस्थेतली दाढ किंवा दात काढण्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता.
पूर्वीचे आणि आताचे उपचार
दात किंवा दाढ किडण्याची अवस्था दाताचा एक्स-रे काढून कळते. अवस्था कोणती यावरून उपचार काय करायचा हे दातांचे डॉक्टर ठरवतात. किडलेल्या दातांवरील पूर्वीचे उपचार आणि त्या उपचारांच्या अत्याधुनिक आवृत्या पाहूया-
वाचा - पंचकर्म म्हणजे काय?
दातात भरली जाणारी चांदी
किडलेल्या दाढांच्या उपचारांमध्ये पूर्वी दाढेत झिंक ऑक्साईड आणि लवंगाचा अर्क असलेले सिमेंट भरून नंतर त्यात चांदी भरत असत. पण चांदी भरण्याच्या या इलाजाला काही ठळक मर्यादा होत्या. उदा. दाढ किडण्याच्या पहिल्या दोन अवस्थांपर्यंतच चांदी भरण्याचा उपचार यशस्वीपणे करता येई. चांदीचे फिलिंग काळपट दिसत असल्यामुळे दर्शनी भागातल्या किडलेल्या दातांमध्ये चांदी भरता येत नसे. भरलेली चांदीचे फिलिंग दाढेला चिकटून बसत नाही. त्यामुळे दाढेतला खड्डा फारच मोठा असेल तर त्यात केलेले चांदीचे फिलिंग तुटते आणि दीर्घकाळ टिकत नाही. शिवाय चांदीचे फिलिंग करताना त्यात अगदी अल्प प्रमाणात पाऱ्याचा समावेश असतो. पाऱ्याच्या दुष्परिणामांच्या म्हणजे ‘मक्र्युरी पॉयझनिंग’च्या तथाकथित भीतीमुळेही दातात चांदी भरणे अनेक देशांत बंद होऊ लागले आहे. (असे असले तरी जगातील बहुसंख्य दंततज्ज्ञ मक्र्युरी पॉयझनिंग खूपच नगण्य असून त्याचे दुष्परिणाम होत नसल्याचेच मानतात.)
वाचा - अश्याप्रकारे आपल्या शरीरात मुतखडा तयार होतो.
आधुनिक पद्धतीने दातांचे ‘फिलिंग’-
दातात चांदी भरण्याच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर त्या जागी एखादे नवीन ‘फिलिंग मटेरियल’ येण्याची गरज जाणवू लागली. ही गरज ‘ग्लास आयनोमर’ आणि ‘कंपोझिट रेझिन’ या दोन फिलिंग मटेरियल्सच्या शोधामुळे पूर्ण झाली. चावण्याच्या बाबतीत या दोन मटेरियल्सची क्षमता जवळपास चांदीच्या फिलिंगच्या क्षमतेइतकीच असते. शिवाय हे पदार्थ तंतोतंत दाताच्या रंगासारखे दिसतात. त्यामुळे अल्पावधीतच या नवीन फिलिंग मटेरियल्सनी चांदीच्या फिलिंगची जागा घेतली. दातांसारखाच रंग असल्यामुळे दर्शनी भागातील दातांमध्येही ही मटेरियल्स भरता येतात, फिलिंग केले आहे हे कळतही नाही. ही मटेरियल्स दाताला किंवा दाढेला चिकटून बसतात. या गुणधर्मामुळे किडलेला दात कमीत कमी कोरावा लागतो आणि केलेले फिलिंग अधिक काळ टिकतेही. पुढच्या दातांमधील फटी बुजवणे, सदोष आकार असलेल्या किंवा तुटलेल्या दातांचा आकार पूर्ववत करणे, दातावरचे डाग घालवणे, दातांसाठी तात्पुरत्या ‘कॅप’ बनवणे अशा विविध कारणांसाठीही ग्लास आयनोमर आणि कंपोझिट रेझिन ही फिलिंग्ज वापरतात.
तुम्हालाही पडलेले असतील असे प्रश्न
दात दुखीवर चांगले पेनकिलर कोणते?
दात दुखीवर अनेक घरगुती उपाय आहेत. तात्पुरत्या स्वरुपात तुम्हाला आराम हवा असेल तर तुम्ही नैसर्गिक पेनकिलर्स घेऊन घरगुती उपाय करु शकता. पण जर तुम्ही पेनकिलरचा विचार करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारचे पेनकिलर घेऊ नका. कारण तुमचे वय, लिंग आणि तुमचा आजार यावर आधारीत तुम्हाला पेनकिलरचा डोस दिला जातो. त्यामुळे दात दुखत असल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच तुम्ही पेनकिलर घ्या.
दातदुखी कितीवेळापर्यंत राहते?
दात दुखीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला त्याचा त्रास चिरंतर काळासाठी होऊ शकतो. एखाद्यावेळी तुम्हाला तुमची दात दुखी थांबल्यासारखी वाटेल पण लक्षात ठेवा ती क्षणिक असेल. तुम्ही दात दुखी कमी करण्यासाठी कितीही घरगुती उपाय केले तर देखील त्याचा त्रास जाणून घेणे फारच गरजेचे असते. म्हणूनच तुमची दात दुखी किती काळ राहते यापेक्षाही तुम्ही त्याकडे लक्ष देणे आवश्यक असते.
छान चवीचे पदार्थ खायला सर्वानाच खूप आवडतात. पण खाऊन झाल्यावर खळखळून चूळ भरणे, गुळण्या करणे, सकाळप्रमाणेच रात्री झोपतानाही ब्रशने दात घासणे या साध्या गोष्टींचा मात्र अनेकांना आळस असतो. रोज अशा लहान लहान बाबींची काळजी घेतली तर दाताच्या समस्या उद्भवणारच नाहीत.
वाचा - हिवाळ्यात वजन वाढवायचे असेल तर हे करा....
काय वरचे दात काढल्यावर डोळे कमजोर होतात.?
सत्य- पूर्वी दात काढण्याची वेळ सहसा वयस्कर व्यक्तींवर यायची. चाळिशीच्या आसपास उद्भवलेली दातांची दुखणी, त्यामुळे काढावे लागलेले दात आणि साधारणपणे त्याच वेळी लागलेला चाळिशीचा चष्मा या तीन गोष्टी योगायोगाने एकत्र आल्यामुळे वरचे दात काढल्यावर डोळ्यांवर वाईट परिणाम होतो असा समज रूढ झाला असावा. खरे म्हणजे दातांच्या आणि डोळ्यांच्या शिरा पूर्णत: वेगळ्या असतात. त्यामुळे दात काढण्याचा डोळ्यांवर परिणाम होणे शक्य नाही.
दातांची स्वच्छता करून घेतली तर दात सैल होतात का?
सत्य- दातांच्या भोवती असणाऱ्या हिरडी आणि हाडांच्या मजबुतीवर दातांचा मजबूतपणाही अवलंबून असतो. दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले तर दात व हिरडय़ांभोवती ‘टारटर’ आणि ‘प्लाक’ म्हणजे जंतूंचा थर जमतो. हे जंतू हिरडय़ा व दातांची झीज करू लागतात आणि दातांमधली फटही वाढवतात. दातांचे डॉक्टर रुग्णाच्या दातांची स्वच्छता करताना हा थर दूर करतात. दात व हिरडय़ांवर जमलेला थर दूर झाला की दातांमधली फट नीट दिसू लागते आणि दात सैल झाले की काय, असा रुग्णांचा समज होतो. पण हा थर काढल्यामुळे दातांच्या पुढच्या समस्या टळतात. खरे म्हणजे प्रत्येकाने सुरूवातीपासूनच आपल्या दातांची योग्य निगा राखली तर डॉक्टरांकडून दात स्वच्छ करून घ्यायची वेळच येणार नाही.
काय दातांमधील कीड काढून दात भरून घेतल्यावर ते पुन्हा किडत नाहीत.
सत्य- दातांमधली कीड काढली की त्यात ‘फिलिंग’ भरले जाते. पण पुढच्या काळात मौखिक आरोग्य चांगले ठेवले नाही तर दात पुन्हा किडू शकतात. कारण फिलिंग भरलेले असले तरी दातांमधील नसा
आणि रक्तवाहिन्या जिवंत असतात. त्यामुळे प्रसंगी विशिष्ट प्रकारच्या ब्रशचा वापर करून दात स्वच्छ ठेवणे फायद्याचे ठरते.
दुधाचे दात आपोआप पडून नवीन येणारच असतात, त्यामुळे दुधाच्या दातांची निगा राखणे आवश्यक नाही किंवा नाही !
सत्य- दुधाचे निरोगी दात हा पक्क्य़ा दातांचा पाया असतो. हल्ली फास्ट फूड आणि गोळ्या- चॉकलेट अति प्रमाणात खाल्ले गेल्यामुळे लहान मुलांचे दुधाचे दात लवकर किडतात. हे दात किडून तिथे वेदना होऊ लागल्यामुळे मूल नीट खाऊ शकत नाही. यावर सोपा उपाय म्हणजे बाळाला पहिला दुधाचा दात आला की त्याचे दात आणि तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी पालकांनी काळजी घेणे. मूल थोडेसे मोठे झाले की त्याला सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश- पेस्टने दात घासण्याची सवय लावणे.
ब्रशपेक्षा दंतमंजन आणि बोटांच्या साहाय्याने दात स्वच्छ करणे चांगले आहे का?
सत्य- दातांच्या मध्ये अनेक फटी असतात. दाढांच्या वरच्या भागावर नैसर्गिक उंचवटे, खोलगट भाग आणि चिरा असतात. या ठिकाणी अन्नकण अडकून राहतात. ब्रशचे ब्रस्टल्स या कान्याकोपऱ्यात पोहोचून अडकलेले अन्नकण स्वच्छ करतात. बोटांच्या साहाय्याने दात घासल्यासारखे वाटले तरी अन्नकण साफ होतीलच असे नाही. पण पावडर आणि बोटांनी हिरडय़ांना मसाज करणे फायद्याचे ठरते आणि ब्रशने दात घासून झाल्यावर ते जरूर करावे.
ब्रश वापरल्यामुळे हिरडय़ांमधून रक्त का येते?
सत्य- हिरडय़ांमधून रक्त येणे हे ‘पायोरिया’ या दंतरोगाचे लक्षण असू शकते. दाताभोवती साचलेले कीटण या रोगासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. कीटण साचल्यामुळे हिरडय़ा सुजतात व लालसर आणि सैल होतात. अशा हिरडय़ांवर ब्रश फिरवला की रक्त येते आणि रुग्णाला ब्रश वापरणेच सोडून द्यावेसे वाटते. अशा वेळी ब्रशऐवजी बोटांनी दात घासले तर कदाचित हिरडय़ांमधून रक्त येणार नाही पण बोटांनी कीटण स्वच्छही होत नाही. अशा वेळी दंतवैद्यांकडून दात व हिरडय़ांची तपासणी करून घेऊन गरज असल्यास दातांची स्वच्छता (स्केलिंग) करून घ्यावी. हिरडय़ांवरील कीटण काढून टाकल्यावर ब्रशने दात नक्कीच घासता येतील.
दातांचे उपचार करून घेताना फार वेदना होतात का?
सत्य- योग्य रित्या भूल देऊन दातांचे सर्व उपचार वेदनारहित पद्घतीने होऊ शकतात. दातांमध्ये देण्याच्या इंजेकशनची सुईही आता ‘मायक्रो नीडल’ प्रकारची वापरतात. हिरडय़ांवर विशिष्ट प्रकारचे जेल किंवा स्प्रे वापरून सुई टोचण्याआधी हिरडय़ा बधिर करता येतात. त्यामुळे सुई टोचली तरी टोचल्याची संवेदना जाणवत नाही. लेसर उपचारपद्धतीसारख्या आधुनिक पद्धतीही आता अगदी रुढ झाल्या आहेत.
आपल्या दाताचे दुखणे पटकन कसे कमी करता येईल ?
तुम्हाला दातांचे दुखणे अगदी पटकन कमी करायचे असतील तर तुम्ही दाताखाली लवंग ठेवा. लवंगाच्या चावण्यामुळे तुमची दात दुखी कमी होते. फार पूर्वीपासूनच दात दुखीवर लवंग किंवा लवंगाचे तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्हाला जर पटकन आराम हवा असेल तर तुम्ही दाताखाली लवंग घ्यायाला विसरु नका.
कोणाच्या हिरड्या मजबूत नसतात, त्यावर सूज असते किंवा हिरड्यात पू होतो, कोणाचे दात किडलेले असतात तर कोणाचे दात हायपर ऍसिडिटी मुळे अशक्त झालेले असतात..
पण ते एकदा दुखायला लागले की डोळ्यापुढे तारे चमकायला लागतात.. दात दुःखी वाढत गेली तर गालाच्या नसांपर्यंत पोहोचते, पुढे डोकेही दुखायला लागते, जबडा देखील हलवता येत नाही अशी अवस्था होते.
दातदुखीसाठी आपण ढीगभर पेनकिलरच्या गोळ्या आणून ठेवतो.. आणि दुखला दात की खा पेनकिलर असा सपाटा लावतो..
मात्र कधी डॉक्टरांकडे चौकशी करून पहा. हे अतिप्रमाणात खाल्लेले पेनकिलर्स अतिशय घातक ठरतात आपल्या शरीरासाठी.
मात्र कधी कधी दाताचे दुखणे इतके पराकोटीला पोहोचते की त्याशिवाय काही पर्यायदेखील उपलब्ध नसतो…
मात्र दातांची ट्रीटमेंट हे खूप वेळखाऊ काम आहे.. त्यात पैसाही खूप घालावा लागतो..
ज्यांना दातांच्या खूप तक्रारी आहेत त्यांच्या तर दातांच्या दवाखान्यात वाऱ्या असतात.. दातदुखीला औषधा शिवाय पर्यायच नसतो.. म्हणून वेळीच औषध घेऊन वेदनादायक दातदुखी थांबवली पाहिजे..
टोकाची दात दुःखी असल्यास डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. पण कधीतरी क्वचित दातांचा त्रास होत असेल, किंवा रात्री अपरात्री अचानक दातात कळ येत असल्यास खालील आयुर्वेदिक उपाय करून पहा.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
दातदुखीवर घरगुती आयुर्वेदिक उपचार
दात दुखीची कारणं जाणून घेतल्यानंतर आता आपण दात दुखणे घरगुती उपाय जाणून घेऊया. हे दात दुखणे उपाय आहेत जे तुम्हाला घरच्या घरी अगदी सहजपणे उपलब्ध होतील. मग जाणून घेऊयात दात दुखीवरील घरगुती उपाय
पेपरमिंट टी बॅग
पेपरमिंटचा उपयोग करुन दात दुखी करता येईल कमी
हल्ली वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये टी बॅग मिळतात. जर तुमच्या दात दुखीमुळे तुमच्या जबड्याला सूज आली असेल तर तुम्ही पेपरमिंट टी बॅगचा उपयोग करु शकता. पेपरमिंट टी बॅगमुळे तुमच्या दातांचे दुखणे कमी होते. पेपरमिंटमध्ये असलेल्या थंडाव्यामुळे तुमचे दात सुन्न पडतात. तुमच्या दातांचे दुखणे कमी होते. त्यामुळे जर तुमच्याकडे पेपरमिंट फ्लेवरच्या टी बॅग्स असतील तर त्या तुम्ही दाताखाली ठेवा.
पेपरमिंट टी बॅग्स चा उपयोग:
हल्ली ग्रीन टीचे प्रस्थ वाढल्यामुळे ह्या टी बॅग्स घरात सहज उपलब्ध असतात. दातातील वेदना कमी करण्यासाठी आणि हिरड्यातील सेन्सिटीव्हीटी कमी करण्यासाठी पेपरमिंट फ्लेवरच्या टी बॅग्सचा उपयोग करता येतो.
वापरलेल्या, कोमट टी बॅगने दुखऱ्या भागावर शेक देणे किंवा वापरलेली ‘टी बॅग’ फ्रीज मध्ये ठेवून थंड करून त्याचा शेक देणे अशा प्रकारे ह्या बॅगचा वापर करून वेदना कमी करता येतात..
लवंग
लवंगाचा उपयोग करुन दात दुखीवर मिळेल आराम
दातदुखीवर रामबाण इलाजामध्ये अगदी हमखास नाव घेतेल जाते ते लवंगाचे. लवंग अनेक बाबतीत गुणकारी असते. पण दातासाठी लवंग अगदी हमखास खाण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण असे की, लवंगामधील घटक तुमची दात दुखी शमवण्यास मदत करतता. शिवाय तुमच्या दातांना लागलेली कीड आणि जीवाणू नष्ट होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला दात दुखी झाली की लगेचच दाताखाली लवंग पकडा. तुम्हाला थोड्यावेळाने का होईना आराम मिळेल.
लवंगेत युजेनॉल नावाचे अँटिसेप्टिक नैसर्गिक रित्या उपलब्ध असते. ह्यामुळे वेदनाशामक म्हणून हे वापरले जाते.. तसेच दातांच्या भवती आग होत असल्यास ती आग / जळजळ सुद्धा लवंग कमी करते..
लवंग तेलात कापसाचा बोळा बुडवून दुखणाऱ्या दातावर ठेवून द्यावा. हे दिवसातुन २-३ वेळेस करण्यास हरकत नाही.. किंवा एखादी लवंगसुद्धा चावून त्याचा रस दुखऱ्या दातापाशी नेऊन ठेवावा.. ह्याने निश्चितच दुखणे कमी होते.
लसूण
लसूणीच्या कच्च्या पाकळ्या खावून मिळेल आराम
लसूणमध्ये एलिसीन नावाचे जे घटक असते ते तुमच्या दातांसाठी चांगले असते. तुमचे दात दुखत असतील तर तुम्ही कच्च्य्या लसणीच्या दोन -तीन पाकळ्या छान चावून खा. लसूणामधील रस तुमच्या दातांचे दुखणे थांबवण्यास मदत करतो आणि दातांमधील जंतू कमी करण्यास मदत करते.
लसूण, हा दातदुखी बरी करण्यासाठी वापरण्यात येणारा आयुर्वेदिक पदार्थ..आहे !!
पूर्वापार बऱ्याच दुखण्यांवर गुणकारी म्हणून लसूण फेमस आहे.. लसूण बॅक्टेरिया मारायला जहाल औषध आहेच पण दातदुखीवर सुद्धा गुणकारी आह.
व्हॅनिला एक्सट्रॅक्ट
केक किंवा इतर गोड पदार्थांमध्ये वापरला जाणारे व्हॅनिला एक्सट्रॅक्ट सुद्धा तुमच्या दातांसाठी चांगला आहे. व्हॅनिला एक्स्ट्रॅक्टमध्ये अल्कोहोल असते जे तुमच्या दातांचे दुखणे त्वरीत थांबवते. तुमच्या दातांना सुन्न करते .त्यामुळे तुम्हाला दात दुखी जाणवत नाही. कापसाच्या बोळ्यावर व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घेऊन तुम्ही दुखणाऱ्या दातांमध्ये ठेवा तुम्हाला लगेचच आराम मिळेल.
व्हॅनिलाचा रस:
ह्याच व्हॅनिलाचा थोडासा रस (एक्सट्रॅक्ट) एक कापसाच्या बोळ्यावर घेऊन दुखणाऱ्या दातावर काही काळ ठेवून द्यावा. व्हॅनिलाच्या रसात मद्याचे प्रमाण असल्याने दुखणारा भाग सुन्न होऊन, दुखणे कमी होते.. हे एक अँटीऑक्सिडंट म्हणूनही वापरले जाते..
मिठाचे पाणी
मिठाच्या पाण्यामुळे दातांचे दुखणे होते कमी
मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणे:
हलकीशी दातदुखी असेल तर किंवा दातांमध्ये काही अन्नपदार्थ अडकून दात दुखत असेल तर मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणे हा उत्तम उपाय आहे.
मिठाचे पाणी दातात अडकलेले अन्नकण सोडवते.. मीठ हे डिसइनफेक्टन्ट असल्यामुळे ते दातातील किटाणू मारते.. दातांच्या भोवताली जर सूज किंवा जखमा असतील तर त्या बऱ्या होण्यास देखील मिठाच्या पाण्याच्या चुळा भरल्यास मदत होते..
ग्लासभर कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घाला आणि दात घासून झाल्यावर ह्या पाण्याने खळखळून चुळा भरा.. दातदुखीतून लवकर आराम मिळेल..
अनेकदा दात दुखल्यानंतप मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगितल्या जातात. मिठाच्या पाण्यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळतो. तसेत मिठाच्या पाण्यामुळे तुमच्या दातांमधील जंतूचा नायनाट करण्यास मदत मिळते. (पण मिठाच्या पाण्याचा अति वापरही तुम्ही करणे चांगले नाही.)
हिंग
हिंगामुळे दात दुखी होते कमी
दातांच्या दुखण्यावर हिंग हा देखील एक चांगला उपाय आहे. लिंबू पाणी तयार करुन त्यामध्ये थोडासा हिंग घालावा. कापसाने तुमच्या दातावर हिंग असलेला कापूस ठेवून तोंड बंद करुन 5 ते 10 मिनिटं बसावे लहेत आराम मिळतो.
हायड्रोजन पेरॉक्साईडने चुळा भरणे:
दातांवर प्लाक (किटण चढणे) असेल किंवा हिरड्यातून रक्त येत असेल तर हायड्रोजन पेरॉक्साईड च्या चुळा भरून घ्या. त्यामुळे हे बरे होईलच परंतु तोंडातील किटाणू, दातदुखी आणि सूज सुद्धा ह्याच्यामुळे बरी होईल..
हायड्रोजन पेरॉक्साईड वापरताना ते आधी पाण्यात मिसळून घ्यावे लागेल.. चमचाभर पेरोक्साईड तितक्याच पाण्यात मिसळायचे आणि चुळा भरायच्या..
किंवा ग्लासभर पाण्यात थोडेसे मिसळून चुळा भरायच्या. नंतर साध्या पाण्याने पुन्हा तोंड धुवून घ्या.
2.यासाठी तुम्हाला एका भांड्यात तुम्ही दोन मोठे चमचे हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन त्यात त्या दुप्पट पाणी घ्या. या पाण्याच्या फक्त गुळण्या तुम्हाला करायच्या आहेत. तुमच्या दातांचे दुखणे कमी होईल ( असे करताना तुम्ही चुकूनही हायड्रोजन पेरॉक्साईड गिळू नका. कारण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.)
बर्फाचे तुकडे
बर्फामुळे मिळतो आराम
जर तुमच्या जबड्याला सूज आली असेल तर आराम मिळण्यासाठी तुम्ही बर्फाचा उपयोगही करु शकता. एका जाड कपड्यामध्ये बर्फाचे तुकडे घेऊन, त्यात मीठ घाला आणि त्याचा शेक तुमच्या जबड्याला द्या. तुमची दात दुखी थोड्या वेळासाठी का होईना थोडी कमी होईल.
खेळाडू दुखऱ्या मुकामारावर ज्याप्रमाणे बर्फाची बॅग ठेवून शेकतात त्याचप्रमाणे दुखऱ्या दातांचा इलाज शक्य आहे.
आईसबॅग किंवा एखाद्या रुमालात बर्फाचे तुकडे गुंडाळून दुखत असलेल्या दातांच्या बाहेरून शेक द्या..
बर्फाच्या थंडाव्याने तिथले रक्त गोठते आणि वेदना शांत होतात.. एक वेळेला २० मिनिटे तुम्ही हा शेक घेऊ शकता.. दुखणे कमी न झाल्यास पुन्हा काही तासांनी हा शेक घ्यायचा
वरील सगळे उपाय घरात बसल्या बसल्या करता येणे शक्य आहे.. अजूनही काही उपाय तुम्ही दात दुखीवर करू शकता मात्र हे पदार्थ घरात नसल्यास बाहेरून विकत आणून ठेवावे लागतील.
पेरूच्या झाडाची पाने:
दातातील आगआग कमी करण्यास पेरूच्या झाडाची पाने उपयोगाला येतात. ह्यामध्ये अँटीमायक्रोबायल ऍक्टिव्हिटी घडत असल्याने तोंडातील बॅक्टेरिया घालवणे, दुर्गंधी घालवणे, दातदुखी कमी करणे अशा ओव्हरऑल सगळ्या कारणांवर हे उपयुक्त ठरते.
ताजी पाने चावून चावून रसाने चुळा भरणे किंवा उकळत्या पाण्यात पाने टाकून त्याचा काढा माऊथवॉश म्हणून वापरणे, अशा पद्धतीने पेरूची पाने तुम्ही तोंडाची काळजी घेण्यासाठी वापरू शकता..
व्हीटग्रास:गव्हांकुर
व्हीटग्रास चा ज्यूस खूप माणसे बारीक होण्यासाठी सकाळी सकाळी घेतात.. ह्यात अँटीऑक्सिडन्ट प्रॉपर्टीज आहेत.. तसेच हे व्हीटग्रास दातातील इन्फेकशन्स कमी करते आणि जळजळ कमी करते.
व्हीटग्रास मध्ये असलेले क्लोरोफिल तोंडातील बॅक्टेरियाना पळवून लावते. जो जुस आपण अँटीऑक्सिडन्ट म्हणून पितो तोच ज्यूस चुळा भरण्यासाठी वापरावा.. दातांच्या वेदना कमी होतात..
गव्हांकुराचे फायदे भरपूर आहेत. उत्तम केसांसाठी आणि त्वचेसाठी गव्हांकुर चांगले आहे. तुमच्या दातांच्या आरोग्यासाठीही गव्हांकुर चांगले असते. गव्हांकुराचे सेवन तुम्ही अगदी कधीही करु शकता. यामुळे तुमचे दात मजबूत राहतात. तुमच्या दातांमधील जंतू आणि किटाणूंना मारण्यास मदत मिळते. दात दुखणे उपाय यांमध्ये हा चांगला उपाय आहे.
महत्वाचा स्वस्त आणि आयुर्वेदिक उपाय
मात्र दात काढण्याआधी बिनपैशांचा साधा सोपा उपाय नक्की करून पाहा. चिमुटभर खायचा चुना घ्या, आणि चिमुटरभर तुरटी (फिटकी)ची पावडर घ्या. चुना+तुरटी+दोन थेंब पाणी घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट कापसाच्या मदतीने दातांना लावा.
पेस्ट लावण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या...
ही पेस्ट लावण्याआधी हे लक्षात घ्या की पेस्ट लावण्याआधी तोंड आ करा, वरील दात खालील दातांना काही मिनिटे लागू देऊ नका, जिभही नाही. यामुळे लाळ वाहून येईल, याच्यात किड वाहून जाईल. हे दुसऱ्या दिवशीही करा. म्हणजे राहिलेली किड देखील निश्चित निघून जाईल. ही पेस्ट कापसाने भरपूर लावा. व्यवस्थित लावा.
दाताच्या आरोग्यसाठी ह्या गोष्टीचे सेवण करा
आपले दात चांगले तर आपले आरोग्य चांगले. आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी आणि दात मजबुत करण्यासाठी काय उपाय योजावेत याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? नसेल तर करून घ्या.
डॉक्टरकडे न जाता बहुतेकदा दाताची दुखणी अंगावरच काढली जातात. अगदीच नाइलाज झाला म्हणजे डेंटिस्टकडे जाणे होते. दातांचे दुखणे नको आणि त्यावर औषधोपचार तर नकोच नको, असे वाटत असेल, तर मुळात हे दुखणेच येऊ नये यासाठी काय करायचे. त्यावर उत्तर म्हणजे विवधि फळे, भाज्या आणि कडधान्य खायची.
✔️दात स्वच्छ आणि मजबूत राहावेत यासाठी स्ट्रॉबेरी हे एक अत्यंत उपुयक्त फळ आहे. स्ट्रॉबेरीमध्ये असे अनेक गुणधर्म आणि वैशिष्टये आहेत, जे दात स्वच्छकरून त्यांना ब्लीच करण्यास मदत करतात. चहा आणि कॉफीमुळे दातांवर पडलेले डाग स्ट्रॉबेरीमुळे स्वच्छ होतात. जेवणानंतर नियमितपणे थोडीफार स्ट्रॉबेरी खायला हवी. स्ट्रॉबेरीमधील आम्ल दातांना नैसर्गिकरीत्या उजळपणा आणते.
✔️कोबी खाताना त्याचे दातांना घर्षण होते. त्यामुळे दात उजळण्यास मदत होते. कोबी हा नैसर्गिक टूथब्रश आहे. कोबी खाताना तोंडात लाळ तयार होते. ती दातांवर जमलेले सूक्ष्मकणही दूर करते.
✔️कलिंगडाचे दोन काप दररोज खाल्ल्याने शरीरास जितकी `क` जीवनसत्वाची गरज असते, त्यातील २५ टक्के आणि जीवनसत्व यातून मिळते. हे जीवनसत्व दात आणि हिरड्या यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. लोह अधिक प्रमाणात शोषूण घेण्याची क्षमता त्याचबरोबर शरीरातील घातक रसायनांचाही ते सामना करू शकते.
✔️संत्रीही नियमितपणे आहारात घेतली पाहिजेत. संत्र हे `क` जीवनसत्वाचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य उत्तम राहते. लोह अधिक प्रमाणात शोषले जाते. तसेच `क` जीवनसत्त्वाचे पदार्थ चघळल्यामुळे दातांचा नाश किंवा र्हास रोखला जाऊ शकतो.
✔️दररोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरांना स्वत:पासून दूर ठेवणं शक्य होऊ शकते. सफरचंदामुळे दातांचे आयुष्यमान वाढते. सफरचंदाचा रस पिण्यापेक्षा ते चावून खाल्ल्यास दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते. सफरचंद खाल्ल्यामुळे दात स्वच्छ आणि बळकट होतात.
✔️द्राक्षांमध्ये असलेले मॅलिक अॅसिड उत्प्रेरकांसारखे कार्य करते. त्यामुळे दात पांढरे शुभ्र होतात. दातांवरील डाग कमी होतात. जेवणानंतर पाणी प्यायल्यामुळे किंवा चूळ भरल्यामुळे दातांत अडकलेले कण निघून जाण्यास मदत होते.
✔️हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे शरीरास रास बेटा केरोटिन मोठ्या प्रमाणावर मिळते. त्यामुळे मिळालेले `अ` जीवनसत्व आपल्या शरीराला आणि दातांना बळकटी आणते. ताज्या हिरव्या द्विदल कडधान्यांचे दातांवर घर्षण होऊन दात स्वच्छ होतात. तसेच तोंडात लाळ तयार होते. त्यामुळे आरोग्यदायी सुखी आणि आनंदी जीवन जगू शकता.




Comments
Post a Comment