बदलत्या जीवनशैलीत आपण नैसर्गिक वागणे विसरून कृत्रिमपणे वागत राहतो. तसे न करता सहज आणि नैसर्गिकपणे वागा. आपली शरीर यंत्रणा नैसर्गिक आहे. त्यामुळे आपले शरीर जेव्हा काही सूचना, इशारे देते तेव्हा त्यांचे पालन करा. झोप आली तर लगेच झोपा. कारण झोप ही शरीराची प्राकृतिक क्रिया आहे. झोपेमुळे शरीराला विश्रांती मिळते. रात्री वेळेत न झोपल्यास किंवा जागरण झाल्यास दुसरा दिवस आळसात जातो. कामाच्या ठिकाणी अवेळी डुलक्या येऊ लागतात, कामावर परिणाम होऊन कामात चुका होतात. झोप पूर्ण होऊन जाग आली असेल तर अंथरुणावर उगाचच लोळत राहू नका. शौच किंवा लघवीचा वेग अडवून धरू नका. त्याचे त्वरित विसर्जन करून टाका. मलविसर्जन योग्य प्रकारे झाले नाही तर बेचैनी वाढून गॅसही वाढतो. पोट ताठरल्यासारखे होऊन बेचैनी वाढते. हे पण वाचा - आयुर्वेदानुसार आपले जेवण कसे असावे घराबाहेर जायचे आहे आणि बाहेर गेल्यावर गडबड नको म्हणून शौच-लघवीचा वेग आला नसतानाही आपण कुंथून मल-मूत्र विसर्जनाचा प्रयत्न करतो. अशा वेळी जोर-जबरदस्तीने मल बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गुदद्वाराच्या त्वचेला जखम होऊ शकते. वारंवार शौचास होत असल्यास त्याची कारणे शोधा....
gyanbhandargl.blogspot.com