लोह आणि खनिजांचा साठा असलेले काळे मीठ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. रॉक सॉल्ट, पिंक सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट आणि हिमालयन सॉल्ट अशा नावानंही काळे मीठ ओळखलं जातं. डॉक्टर तसंच आहारतज्ज्ञ आपल्याला मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात. पण काळ्या मिठाच्या सेवनामुळे आपल्याला कित्येक आरोग्यदायी लाभ मिळतात. पोटाशी संबंधित समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही आहारामध्ये काळ्या मिठाचा उपयोग करू शकता. उलटी, अपचनाचा त्रास होत असल्यास काळ्या मिठाचे सेवन करावं. मळमळ जाणवत असल्यास एक ग्लास सोड्यामध्ये किंचितसे काळे मीठ टाकावे आणि प्यावे. यामुळे मळमळण्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल. केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेसाठीही काळे मीठ फायदेशीर आहे. काळ्या मिठामध्ये शरीरास आवश्यक असणारी पोषण तत्त्वे तसंच खनिजांचा भरपूर प्रमाणात साठा आहे. पांढऱ्या मिठाच्या तुलनेत काळ्या मिठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. संशोधनातील माहितीनुसार सोडियमचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढते. वजन वाढू यासाठी तुम्ही आहारामध्ये काळ्या मिठाचा वापर करू शकता.
हे पण वाचा -साफ मलप्रवूत्ती होऊन पोट साफ झाले तर समजवे आपला आजचा दिवस छान जाणार आहे
काळ्या मिठामध्ये लोह आणि खनिजांच्या घटकांसोबत भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म देखील आहेत.
समुद्रामध्ये तयार होणारे मीठ सर्वांनाच माहिती आहे, पण काळे मीठ कसे तयार होते याविषयी तुम्हाला माहिती आहे का? काळ्या मीठा विषयी खुप कमी लोकांना माहिती आहे. चाट, आलू पकोडे, रायता हे चटपटीत बनवण्यासाठी काळ्या मीठाचा वापर केला जातो. काळ्या मीठाची निर्मिती ज्वालामुखीच्या दगडांपासून केली जाते. गुलाबी रंगाच्या या मीठामध्ये सोडियम क्लोराइड असते आणि यामुळे हे खारट असते. तर आयरन सल्फाइडमुळे याचा रंग थोडा जांभळा असतो. काळे मीठ लो ब्लड प्रेशर, पचनक्रिया, पोटात जळजळ, गॅस या सर्व समस्यांसाठी लाभदायक असते.
- पांढऱ्या मिठामध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते. सोबतच यामध्ये पोटॅशियम आयोडेट आणि एल्युमिनियम सिलिकेट यांसारखे तत्त्व देखील असतात. हे घटक आरोग्यासाठी अपायकारक असतात.
- याच कारणामुळे आयुर्वेदाचार्यांसह अन्य डॉक्टर देखील आहारामध्ये कमी प्रमाणात मिठाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
हे पण वाचा - कडधान्याला मोड कसे आणावे
- तसंच पांढऱ्या मिठासह सॅलेड न खाण्याचाही सल्ला दिला जातो.
- पांढऱ्या मिठाच्या अति सेवनामुळे रक्तदाब आणि हृदयविकार यासारख्या समस्या वाढतात.
- तर काळ्या मिठामुळे आपली पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
- जी लोक सांधेदुखी, पायांच्या दुखण्यामुळे त्रस्त आहेत, ते काळे मीठ गरम करून पायांना शेक देखील देऊ शकतात.
- या उपायामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.
- पण त्वचेच्या काही समस्या असल्यास हा उपाय करू नये.
हे पण वाचा - वेळेवर जेवत नसाल तर हे वाचा
पोटदुखीसाठी लाभदायक
- जर तुम्हाला पोटदुखीचा खूप गंभीर स्वरुपात त्रास होत असेल तर काळ्या मिठासह ओवा चावून खा. ओवा आणि काळे मीठ चावून पटकन गिळायचे नाही हे लक्षात ठेवा.
- ओव्याची चव कडवट असते. पण यामुळे तुमची पोटदुखी कमी होण्यास मदत मिळते.
- पोटदुखीवर ओवा हे प्रभावी औषध आहे.
- नियमित स्वरुपात सॅलेड किंवा अन्य खाद्यपदार्थांमध्ये काळ्या मिठाचा उपयोग केल्यास तुमच्या गॅस, अपचन तसंच बद्धकोष्ठतेच्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
हे पण वाचून पहा - वारंवार कुरूप होत असेल तर हे उपाय करणं फायदेशीर आहे
- पचनच्या समस्या कमी झाल्यास तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाण्यास मदत मिळेल.
- काळ्या मिठामुळे शरीराची पचन प्रक्रिया सुधारते. यामुळे आपल्याला शारीरिक तसंच मानसिक स्वरुपातही आराम मिळतो. कारण यामुळे हॅपी हार्मोन्सचा स्त्राव अधिक प्रमाणात होतो आणि मज्जातंतूचे दुखणे कमी होते.
- काळ्या मिठाच्या सेवनामुळे झोप तसंच मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या असणाऱ्या हार्मोनचा स्तर वाढतो. काळ्या मिठामुळे शरीरामध्ये मेलाटोनिन हार्मोनची पातळी वाढते. यामुळे आपल्याला चांगली आणि गाढ झोप मिळते.
हे पण वाचा -अबब!! मेथीच्या दाण्याचे इतके फायदे-
- सोबत सेराटोनिन हार्मोनचा स्त्राव देखील वाढतो. हे हार्मोन आपल्याला तणावमुक्त ठेवण्याचे कार्य करते. तणावमुक्तीमुळे आपल्याला चांगली झोप मिळते. तसंच मेंदूच्या कार्यातही अडथळे निर्माण होत नाहीत.
- कोमट पाण्यामध्ये काळे मीठ टाकून आंघोळ केल्यास कोरडी त्वचा, त्वचेला खाज सुटण्याची समस्या कमी होते. यामुळे सोरायसिस यासारख्या त्वचा विकारांपासून आपली सुटका होण्यास मदत मिळते.
- काळ्या मिठामुळे आपल्या केसांना देखील पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे केस घनदाट आणि मजबूत होतात. शिवाय, कोरड्या- निर्जीव केसांची समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते.
- केसगळती, कोंडा देखील कमी होतो.
- काळ्या मिठामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत मिळते.
| समुद्रातील मीठ |
- यातील पोषण तत्त्वांमुळे कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
- ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोका कमी होतो.
-लहान मुलांच्या शारीरिक तसंच मानसिक विकासासाठी काळे मीठ लाभदायक असते. यामुळे शरीरातील सोडियमची कमतरता भरून निघते.
: आपल्या शरीराला अंशत: मिठाची गरज असते तर अमेरिकेन सरकारनुसार सुदृढ असलेल्या व्यक्तीला केवळ एक चमचा मीठ दिवसभरासाठी पुरेसे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे, तर अन्य कार्यासाठी स्वादिष्ट खनिजातून मिळणारे सोडियमचे अंश हे शरीरातील पाण्याचे नियमन आणि मंज्जातंतूच्या कार्यावर नियंत्रण आणते. संशोधकांच्या मते, सोडियमचा अतिरिक्त वापर हा उच्च रक्तदाबाव्यतिरिक्त यकृतालाही हानी पोहोचवू शकतो.
चीनमधील जिनान विद्यापीठाचे सुसाँग यांग आणि त्याच्या सहकार्याचा पेशीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांना शोधणे हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी एका उंदराला अतिरिक्त मीठ असलेला आहार दिला गेला आणि सभोवतालच्या खारटपणाचा पक्षाच्या गर्भाशयावरील परिणांमाचेही विश्लेषण केले गेले. या वेळी सोडियमच्या अतिरिक्त सेवनामुळे प्राण्याच्या यकृताबरोबरच पेशींच्या आकारातील विलक्षण बदल, मृतपेशींमध्ये झालेली वाढ आणि पेशींच्या निर्मितीत झालेली घट यातूनच पुढे फिबोरोसिस (व्रण असलेल्या ठिकाणच्या पेशीजालात पेशीजालांची निर्मिती) होत असते. या वेळी संशोधकांनी ‘क’ जीवनसत्त्वाच्या साहाय्याने इजा झालेल्या पेशींवर उपचाराचा प्रयत्न केला असता मिठाच्या अतिरिक्त सेवनाचा हा अंशत: परिणाम असल्याचे दिसून आले.
: मीठ. एक जीवनावश्यक घटक. मिठाशिवाय पदार्थ हा विचार करणंही शक्य नाही. पण अनेकांना प्रमाणापेक्षा मीठ जास्त खाण्याची सवय असते. कोणी मूळ पदार्थच थोडा खारट करतात तर अनेकजण चव आली नाही की वरून घेऊन मीठ खातात. कुशल स्वयंपाकी, आहारतज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक आणि संशोधक मिठाचं महत्त्व मान्य करूनही आहारात मिठाचं प्रमाण योग्य असायला हवं यावर भर देतात.मिठावर झालेली अनेक संशोधनं आणि अभ्यास सांगतो की, मीठ जास्त खाल्ल्यास काय दुष्परिणाम होतात,. शरीरात नेमकं काय विपरीत आणि अनैसर्गिक घडतं हे या अभ्यासातून कळतं. लंडनमध्ये मिठाच्या बाबतीत नुकताच एक अभ्यास करण्यात आला. त्यात जास्त मीठ सेवन केल्यास तहान कमी होऊन भूक वाढते, असं म्हटलं आहे. शरीरात अनावश्यक पाणी केवळ मिठाच्या अतिप्रमाणामुळे साठून राहातं. आहारातील मिठाचं जास्त प्रमाण मूत्रपिंडाच्या कामावर वाईट परिणाम करतं.
हा अभ्यास किंवा अन्य कोणताच अभ्यास, संशोधन, डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ मीठ अजिबात खाऊ नका असं म्हणत नाही. पण मीठ कमी प्रमाणात खाल्लं तर शरीरावर वाईट परिणाम होणार नाही असं ते सांगतात. मीठ जास्त खाल्ल्याचे दुष्परिणाम वाचले तर कदाचित तुम्हीही जास्तीचं मीठ खाण्याची सवय नक्की कमी कराल.
जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम
१) अति प्रमाणात मीठ खाल्ल्यास प्रसंगी मृत्यूही ओढावतो. पोटाचा कर्करोग, स्मृतिभ्रंश, अतिलठ्ठपणा, आॅस्टोपोरोसिस, मूतखडे आणि किडनीचे इतर गंभीर आजारांचं मूळ मीठ खाण्याच्या प्रमाणात असतं.
२) ब्रेन स्ट्रोकच्या कारणांमध्येही मिठाचं अतिप्रमाण हे कारण सांगितलं जातं. उच्च रक्तदाबामुळे ब्रेन स्ट्रोक येतो. या उच्च रक्तदाबाचं कारण अतिप्रमाणात खाल्लेलं मीठ हे असतं.
३) ब्लॉकेजेसमुळे होणारे हृदयविकार हेही अतिमिठाचे परिणाम आहेत. हृदयाकडे रक्त वाहून नेणाºया रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आले तर हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्याचा परिणाम म्हणून हार्ट अटॅक येतो. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांना सूज येते. त्यामुळे त्या पुरेसा रक्तपुरवठा हृदयाला करू शकत नाही. आहारात मिठाचं प्रमाण प्रमाणबद्ध किंवा कमी ठेवून हृदयविकाराचा हा धोका आटोक्यात ठेवू शकतो.
४) लठ्ठपणा यामागे मिठाचं अतिप्रमाण हे कारण असतं. लठ्ठपणामुळे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, झोपेचे विकार, यासारखे आजार जडतात. लठ्ठपणा आणि हे सर्व आजारांचं मूळ मीठ असू शकतं. आहारात मीठ जास्त खाण्याची सवय असेल तर मग आहाराचं प्रमाण वाढतं. आणि आवडीचे पदार्थ म्हणून अतिसाखर आणि मीठ असलेले पदार्थ खाल्ले जातात. यामुळे वजन पटकन वाढतं.हे सर्व आजार टाळून सुरक्षित आणि आनंदी जगायचं असेल तर मीठ कमी खायला हवं, असं आपण आपल्यालाच बजावायला हवं !



Comments
Post a Comment