आयुर्वेदानुसार अन्नभोजन बनवणारी व वाढणारी व्यक्ती..
•आप्त- स्वकीय आपुलकी प्रेम जिव्हाळा असलेली
•तृप्त- प्रसन्न स्वतः नेहमी आनंदी असणारी
•युक्त - भोजनशास्त्र व वाढप कलेत कौशल्य असणारी व मायेने परिपूर्ण
•मुक्त - षड्रिपूंपासून दूर, निरोगी, स्वस्थ शरीर व मनाची अशी असावी..
अन्नपदार्थांचे प्रकार..
दातांनी चावून, जिभेने चाटून, ओठांनी ओढून व चाखून गिळून घेण्याचे पदार्थ असावेत..
भोजन ताट-पान वाढण्याची व अन्नग्रहणाची शास्त्रोक्त पद्धत..
• शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ वाढावे..
• त्याच्या डावीकडे लिंबू व क्रमाने चटणी कोशिंबीर-सलाड-रायते पैकी एक (ऋतूनुसार उपलब्ध पदार्थांचे),
• तळण- भजी, सांडगे, पापड, कुरडई इ( सणवारी ऋतूनुसार) इतके वाढावे..
हे पण वाचा ⬇️⬇️
मलप्रवुत्ती साफ नं होण्याची कारणे
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Amazon वरून खरेदी करा - मोबाईल Redmi 9 [4gb ram, 64gb Storage, Only ₹8999]
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
• सामान्यतः उजव्या हाताने जेवतात; त्यामुळे जे पदार्थ कमी खायचे ते तोंडी लावण्याचे चाटून खायचे पदार्थ डावीकडे वाढावेत. स्वाभाविकता मनुष्य उजव्या हाताने खाताना डावीकडचे पदार्थ कमी खातो.
• याचवेळी भोजनमंत्र सुरू करावा. येथपर्यंत आम्लयुक्त आंबट व तुरट पदार्थामुळे जिव्हेवरची लाळ सुटायला प्रारंभ होतो. ज्यामुळे अन्न पचनास सुलभता येते.मोठ्याने भोजनमंत्र म्हटल्याने त्या आघाताने टाळू व कंठातील ग्रंथी स्रवायला लागतात. मुखातून चावून बारीक झालेल्या अन्नाच्या तुकडे यामुळे अन्ननलिकेत सहज ढकलले जातात.
हे पण वाचा - वारंवार कुरूप होत असेल तर हे आयुर्वेदिक उपाय करावे
• यानंतर भोजनकर्त्याच्या समोर ताटाच्या मध्यभागी खालच्या बाजूस जड पदार्थ (चपाती पोळी भाकरी इ) वाढावा.
• उपवास सोडायला बसलो असू तर प्रथम तिथेच वरणभात वाढावा. जो सहजपाच्य आहे आणि कर्बोदके व प्रथिने दोन्ही पुरवतो.
• उजवीकडे मुख्य सुकी व रस्साभाजी वाढावी. जी सर्वात जास्त ग्रहण करायचे व्यंजन आहे. यात तेल मसाले कमी असावेत व मूळ स्वभावात स्वाद असावा.
• वर मिठाच्या उजवीकडे आमटी (द्रव) व मध्ये गोड पदार्थ (जर सणाचे जेवण असेल तर) वाढावेत. हे भाजीच्या बरोबरीच्या प्रमाणात घ्यावेत. अशा पदार्थांमुळे कर्ब प्रथिने स्निग्ध खनिजे इ व जीवनसत्त्वयुक्त अन्नाची गरज पूर्ण होते.
• डावीकडे (इतर अन्नापेक्षा कमी प्यावे म्हणून) पेल्यात पाऊण भरेल एवढेच पाणी शेवटी वाढावे. या क्रमाने वाढल्याने एक चक्र पूर्ण होते.
• येथपर्यंत भोजन मंत्र संपला पाहिजे. तोपर्यंत अन्ननलिकेतून खाली जठर आतडे यकृतापर्यंत संदेश पोचतो की त्यांनी क्रियाशील व्हायचे आहे. ते ग्रहणासाठी तयार राहतात.
• यानंतर जेवणार्याने चित्राहुती घालावी. (या क्रियेत व वैश्वदेव इ मध्ये सृष्टीच्या कल्याणाची कामना असते. याविषयी नंतर सविस्तर पाहू.)
हे पण वाचा -⬇️पोटातील गॅस दूर करा मेथीच्या दाण्याने
• मग अन्न ग्रहण करण्यास आरंभ करावा.
• पहिला घास घेऊन चावून चोथा करून अन्ननलिकेकडे ढकलावा व दुसरा घास घ्यावा. तो आनंदाने मनःपूर्वक चावून रसना तृप्त होईपर्यंत पहिला घास चावला जाऊन तो जठरात साचतो. तिथून नंतर आतड्यातून खाली रस व मल विभक्त होवून सरकतो.
• अशी भोजनप्रक्रिया ही शरीर व मनोविज्ञान शास्त्र अनुकूल असून मानवी देह व मनास फलदायी आहे. या प्रक्रियेत केवळ शाकाहारच वेळेच्या नियोजनात बसतो. मांसाहाराला गरजेची आंतर्यंत्रणा मानवी शरीरात नसल्याने तो निषिध्द समजला आहे.
• भोजन पूर्ण करताना पुन्हा धन्यवादाचा मंत्र म्हणून तृप्त मनाने आपोष्णी - तीन वेळा आचमन करून आजूबाजूला पडलेले खरकटे स्वतः गोळा करावे व भोजनास बसलेल्या सर्वानी एकत्र (वडिलधारी मंडळींच्या आधी उठून त्यांचे ताट स्वतः उचलावे) उठावे.
• ताटातील उष्टेखरकटे शक्यतो स्वतः योग्य त्या जागी ठेवून ताटात पाणी घालून विसळून ठेवावे.
• जेवताना शक्यतो अन्नगप्पाच व्हाव्यात. ही भोजन सभ्यता आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
खरेदी करा amazon वरून - Samsung 3gb ram 32gb storage only ₹_ 7499
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️---➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
भोजन मंत्र
प्रारंभी
ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सहवीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु । मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।
अंती
हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्नं प्रजापतिः | हरिः सर्वशरीरस्थो भुङ्क्ते भोजयते हरिः |
• याव्यतिरिक्त पंगतीत वाढप यंत्रणेस वेळ लागतो म्हणून देव देश धर्मस्तुतिचा गजर करावा. अन्नप्रमाण वय व्यवसाय ऋतु बल इ विचार करुन घ्यावे.
आसन
• ऋतूनुसार मऊ बैठक असावी
• मांडी घालून बसावे. यामुळे रक्तपुरवठा उदराकडे आवश्यक तितका सरकतो व चयापचय योग्यरित्या घडते.
• शक्यतो हातांच्या बोटांनी ग्रहण करावे. कारण ओठ जिव्हा बोटे यांचे तापमान एकसमान असल्याने आंतर्व्यवस्थेला उचित संदेश पोचतो व लाळ ग्रंथी नेमून दिलेले कार्य न बिचकता करतात.
भोजन करणाऱ्या व्यक्तीच्या जेवणाच्या पानाची डावी बाजू ही लवणशाखा
पानाचा मधला भाग हा प्रमुख अन्नभाग
पानाची उजवी बाजू ही शाकशाखा'(भाज्या)
कोणकोणत्या शाखेत (भागात) कोणकोणते पदार्थ वाढावयाचे त्याचे वर्णनः
लवणशाखा :लिंबाची फोड, नानाविध प्रकारची लोणची, रायती, मेतकूट, पापड, भाजणीचे वडे, कुटलेले डांगर, मिरगुंडे, सांडगे, केळे/तोंडले वा कारल्याच्या तळलेल्या काचऱ्या, चिकवड्या, [[फेण्या] ],कुरडया इत्यादी तळलेले पदार्थ, शिजवलेले सुरण/मुळा, गाजर, करवंदे, भोकर, काकडी, हिरवी मिरची, कैरी, लिंबू इत्यादींपासून बनविलेल्या कोशिंबिरी, वांग्याचे भरीत, दहीवडे, घारगे, मुरांबा, मोरावळा इत्यादी.
Best हेडफोन फक्त 300 रुपये च्या रेंजमध्ये
मधला मुख्य भाग :कणकेची सोजी, सपिटाचा वा रव्याचा शिरा, पुरण/ सांजापोळी, तेलपोळी, साधीपोळी, रांजणावर भाजलेले मांडे, तुपात तळलेल्या पुऱ्या, कानवले, करंजी, भाकरी, रोटले, धिरडी, पानवल्या, पानग्या, खांडवी, गूळवड्या, सांजावड्या, डाळीचे ढोकळे, वेगवेगळे लाडू, साधाभात, साखरभात, गूळ-नारळी भात, मसाला भात, राब-भात (तूप व मध मिसळून केलेला) असावा. मध, तूप व दुधाच्या वेगवेगळ्या वाट्या, निरनिराळ्या खिरी, शिकरणी, लोणी, घट्ट दही इत्यादी..
शाकभाग : मेथी, चाकवत, पोकळा, माठ, शेपू, चवळी, घोळ या पालेभाज्या, चवळीची उसळ, केळफूल, वांगी, पडवळ, शेगटाच्या शेंगा, घेवडा, फरसबी, तोंडली, कच्ची केळी, कोहळा, दुधी भोपळा, लाल भोपळा, हिरवा भोपळा या फळभाज्या व विविध प्रकारच्या आमट्या.
हे पण वाचा अगर आपको कमजोरी महेसुस हो रही है तो...
या भोजनासमवेतच, शीतल व सुवासिक पाणी, सायीच्या घट्ट दह्यात मीठ/सैंधव, वाटलेली कोथिंबीर, भाजलेली सुंठ, तळलेला हिंग टाकून व ते घुसळून केलेला मठ्ठापण असावा.
ही सुमारे ३५० वर्षापूर्वीची समर्थ/शिवाजी च्या काळातली नैवेद्याची संकल्पना आहे.
साखरमांडा, गु़ळपोळी, वेलदोडे घातलेला गुळयुक्त शिरा, केळ्यांचे शिकरण, दही-दूध-साय-साखर यांचे मिश्रण, आंब्याच्या रसाने भरलेली वाटी, ताकाची कढी, करंज्या, अमृतफळें क्षीरधारी, वळवट (वळून केलेल्या शेवया-गव्हल्यांची खीर), मधुवडा, कोरवडा, अंबवडा, तिळाच्या लाडूंची जोडी, जिरेसाळी भात, सोललेल्या मूगदाळीचे वरण, नुकतेच कढवलेल्या (गाईच्या) तुपाचा घमघमाट. आणि तुपात बनवलेले जिन्नस असा नैवेद्याच्या थाळीचा उल्लेख एकनाथी भागवतातून येतो.
पारंपारिक पंगतीत लोक जमीन, बसावयाची अंथरुणे अथवा पाटावर जेवण्यास बसत. काही पाट नक्षीदार असत. सहसा मुले, पुरुष, व स्त्रियांची आसन व्यवस्था अथवा जेवण्यास बसण्याच्या वेळेत फरक असे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जातिसंस्थेचा प्रभावही पंगतीतील आसन व्यवस्थेवर असे.
जेवण्याची थाळी मांडण्यापूर्वी रांगोळी काढली जात असे. खास प्रसंगी अथवा खास व्यक्तींसाठी थाळी चौरंगावर मांडण्यासाठी चौरंगासोबत फुलांची आरास, समई आणि उदबत्ती असत. पंगतीच्या थाळ्या म्हणून पळसाच्या पानांच्या पत्रावळी, केळीची पाने, पितळेची अथवा चांदीची ताटे यांचा उपयोग केला जात असे. प्रसंगानुपरत्वे समई आणि उदबत्तीचे स्टॅंड सुद्धा चांदीचे वापरले जात.
आधुनिक काळातील पंगती
बदलत्या काळानुसार समारंभात बसून जेवण्याची पद्धत
कमी होत चालली आहे.त्याऐवजी टेबल-खुर्ची वर बसून जेवण्याची पद्धत आली आहे.मोठ्या पंगतीमध्ये याचा फायदा जेवण वाढणाऱ्याला होतो.त्याचे काम सोपे व जलद होते.
भारतामध्ये अनेक प्रथा अशा आहेत, ज्यांचा संबंध मनुष्याच्या आरोग्याशी आहे. यामधीलच एक प्रथा जमिनीवर बसून जेवण करण्याची आहे. आजही ज्या भारतीय घरांमध्ये जेवण पारंपारिक पद्धतीने वाढते जाते, ते जमिनीवर बसून अन्न ग्रहण करतात.
सध्याच्या काळात अनेक लोक जमिनीवर बसून जेवण करत नाहीत तर काही लोक टीव्हीसमोर बसून किंवा पलंगावर बसून जेवण करणे पसंत करतात. तुम्हाला हे आरामदायक वाटत असेल परंतु आरोग्यासाठी ही सवय ठीक नाही.
आपल्या पूर्वजांनी निश्चितपणे खूप विचार करून जमिनीवर सुखासनात बसून जेवण्याचे विधान सांगितले आहे. जमिनीवर बसून जेवण करण्याची सवय आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. येथे जाणून घ्या, या सवयीचे खास आणि महत्त्वपूर्ण फायदे...
वजन नियंत्रणात राहते -
जेव्हा तुम्ही सुखासनात बसता, तेव्हा तुमचा मेंदू शांत होतो. तुमच्या व्यवस्थितपणे जेवणावर लक्ष केंद्रित करू शकता. डायनिंग टेबलवर जेवण न करता सुखासनात बसून केल्याने खाण्याची गती संथ होते. यामुळे पोट आणि मेंदूला योग्य वेळेवर तृप्तीची जाणीव होते. अशाप्रकारे सुखासनात बसून जेवण केल्याने तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवण करण्यापासून दूर राहू शकता. जमिनीवर बसून जेवन केल्यानंतर पोट सुटत नाही. शिवाय अपचन, जळजळ, पोटासंबधीत विकार होत नाहीत.
ये भी पढे ⬇️⬇️⬇️
२)पचन क्रिया व्यवस्थित राहते...
जेव्हा तुही पद्मासनात बसता तेव्हा तुमची श्रोणी(नाभी) पाठीचा खालील भाग, पोटाच्या जवळपासच्या आणि पोटाच्या मांसपेशींमध्ये तन्यता(ताणल्या जातात) येते. यामुळे चयापचय क्रिया व्यवस्थितपणे कार्य करते. या स्थितीमुळे तुमच्या पोटावर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पडत नाही. यामुळे तुम्हाला खाण्यात आणि अन्न पचवण्यास मदत मिळते.
अन्न पचवणे सोपे -
सुखासनात बसून जेवण केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही जमिनीवर बसून जेवण करता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे खाण्यासाठी थोडेसे पुढे वाकता आणि अन्न गिळण्यासाठी पुन्हा पूर्वस्थितीमध्ये येतात. अशाप्रकारे वारंवार पुढे आणि मागे वाकल्यामुळे तुमच्या पोटातील मांसपेशी सक्रिय होतात. यामुळे तुमच्या पोटातील अॅसिडही वाढते. यामुळे तुम्हाला अन्न पचवणे सोपे जाते.
४)कुटुंबाला एकत्रित ठेवते -
सामान्यतः जमिनीवर बसून जेवण्याची प्रथा एक कौटुंबिक गतिविधि आहे. योग्य वेळेवर संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे जेवण करत असेल तर एकमेकांमधील सामंजस्य वाढते. तुमच्या कुटुंबाशी समरस होण्याचा हा अतिशय उत्तम पर्याय आहे, कारण जमिनीवर बसून जेवण केल्याने तुमचे मन शांत राहते. यामुळे हा उपाय तुमच्या कुटुंबाला एकत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
वेळेआधीच म्हातारपण येऊ देत नाही...
जेवण करण्याची ही पारंपारिक पद्धत तुम्हाला वृद्धावस्थेपासून दूर ठेवते, कारण सुखासनात बसून जेवण केल्याने मणका आणि पाठीच्या समस्या होत नाहीत. सुखासनात बसून जेवल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत.
हे पन वाचा -वेळेवर न जेवण्याचे दुष्परिणाम
वय वाढू शकते -
एका संशोधनानुसार जे लोक जमिनीवर पद्मासन किंवा सुखासनात बसतात आणि कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता उठून उभे राहण्यास सक्षम असतात, त्यांची दीर्घ काळ जगण्याची शक्यता जास्त असते. या मुद्रेतून उठण्यासाठी जास्त लवचिकपणा आणि शारीरिक शक्तीची आवश्यकता असते.
हे वाचा ⬇️--⬇️⬇️हिमोग्लोबिन वाढविन्याचे उपाय
७)डोकं शांत राहते -
जे लोक सुखासनात बसून जेवण करतात, त्यांचा मेंदू तणाव रहित राहण्याची शक्यता जास्त असते, कारण यामुळे मेंदू रीलॅक्स आणि तंत्रीका शांत होतात.जमिनीवर बसून जेवण केल्यांनतर एकाग्रता वाढते.
आयुर्वेदानुसार मन शांत ठेवून जेवण केल्यास अन्न व्यवस्थित पचते तसेच जेवल्यानंतर संतुष्टतेची जाणीव होते.
सुखासनात बसल्याने जठराग्नी प्रदीप्त होतो, त्यामुळे अन्नपचनात मदत मिळते. प्राणवायुला गती मिळते. यकृत व आमाशय दोघांचे कार्य सुलभरीत्या होते.
टेबल-खुर्चीवर बसून जेवल्याने शारीरिक उष्णता योग्यप्रकारे निर्माण होत नाही, त्यामुळे अन्नपचनात मदत मिळत नाही. यकृत व आमाशय व मलाशयाला हानी पोहोचते. पोटाचे विकार उद्भवतात, मूत्ररोग वाढतो.
हे पण वाचा -लसुन खाण्याचे फायदे आणि नुकसान










Nice informetion for AURVEDA
ReplyDeletevery nice..
ReplyDeleteखुप छान माहिती मिळाली.🙏