Skip to main content

संतुलित पोषक आहार म्हणजे काय आहे? मनपसंत पदार्थ समोर आल्यावर भूक नसते पण इच्छा होते ती कृत्रिम भूक)

 बदलत्या जीवनशैलीत आपण नैसर्गिक वागणे विसरून कृत्रिमपणे वागत राहतो. तसे न करता सहज आणि नैसर्गिकपणे वागा.

आपली शरीर यंत्रणा नैसर्गिक आहे. त्यामुळे आपले शरीर जेव्हा काही सूचना, इशारे देते तेव्हा त्यांचे पालन करा.

झोप आली तर लगेच झोपा. कारण झोप ही शरीराची प्राकृतिक क्रिया आहे. झोपेमुळे शरीराला विश्रांती मिळते. रात्री वेळेत न झोपल्यास किंवा जागरण झाल्यास दुसरा दिवस आळसात जातो. कामाच्या ठिकाणी अवेळी डुलक्या येऊ लागतात, कामावर परिणाम होऊन कामात चुका होतात.

झोप पूर्ण होऊन जाग आली असेल तर अंथरुणावर उगाचच लोळत राहू नका.

शौच किंवा लघवीचा वेग अडवून धरू नका. त्याचे त्वरित विसर्जन करून टाका. मलविसर्जन योग्य प्रकारे झाले नाही तर बेचैनी वाढून गॅसही वाढतो. पोट ताठरल्यासारखे होऊन बेचैनी वाढते.


हे पण वाचा -आयुर्वेदानुसार आपले जेवण कसे असावे

घराबाहेर जायचे आहे आणि बाहेर गेल्यावर गडबड नको म्हणून शौच-लघवीचा वेग आला नसतानाही आपण कुंथून मल-मूत्र विसर्जनाचा प्रयत्न करतो. अशा वेळी जोर-जबरदस्तीने मल बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गुदद्वाराच्या त्वचेला जखम होऊ शकते.

वारंवार शौचास होत असल्यास त्याची कारणे शोधा. ताण, भीती, अति काळजी करणे यामुळे, सतत फिरतीची नोकरी असेल तर, निरनिराळ्या ठिकाणचे पाणी पिण्याने, मसालेदार किंवा शिळे अन्न खाल्ल्याने शौचाची भावना होते.

 ॲमेझॉन AC वरून खरेदी करा


भूक लागली तर त्वरित खा. शरीराला आवश्यक असणारी शक्ती अन्नातून मिळते. भुकेच्या वेळी जेवलो नाही तर डोके दुखणे, चक्कर येणे, थकवा वाटणे, घशात जळजळणे, पित्त वाढणे हे विकार होतात. पोट भरले असेल तर खाणे थांबवा. आवडते म्हणून जास्तही खाऊ नका. त्यामुळे शरीराला जडत्व येते, अपचन होते किंवा उलटी होते. भूक लागली नसेल तर अजिबात खाऊ नका.

हे पण वाचून पहा - दोष शरीरात साठतात म्हणजे नेमक काय होत? दोष किती प्रकारचे असतात

तहान लागली तर लगेच पाणी प्या. पाणी घटाघटा न पिता घोटाघोटाने प्या. उन्हात फिरून आल्यानंतर, व्यायाम किंवा शारीरिक श्रम केल्यानंतर, गरम जेवण जेवल्यानंतर, दूध प्यायल्यानंतर, फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.

जांभई आली तर अवरोध न करता कडकडून जांभई द्या.

शिंक आली किंवा ढेकर आल्यास अडवून धरू नका. शिंकताना डाव्या किंवा उजव्या बाजूला मान करून शिंका. समोरच्या बाजूने जोरात शिंक देताना मानेला, खांद्याला हिसका बसतो.


Health suplyment for our body


Go to Amazon site (click hire )


बैठय़ा जीवनशैलीत गॅस होणे वा वायू धरणे स्वाभाविक आहे. ही एक नैसर्गिक क्रिया आहे. यामुळे गॅसचा अवरोध न करता गॅस निवारण करणे केव्हाही चांगले. गॅस कोंडून राहिल्यास निरनिराळ्या ठिकाणी वेदना सुरू होतात. छातीत, पाठीत भरून येते. श्वास लागतो आणि काल्पनिक भीतीने मन:स्वास्थ बिघडते.

हे पण वाचा - मुतखडा कसा व कोणत्या व्यक्तीला होऊ शकतो?

डोकेदुखी ही मोठी समस्या आहे. अगदी लहान मुलेही डोके दुखण्याची तक्रार करीत असतात. डोके दुखले की वेदनाशामक गोळी न घेता त्याचे कारण शोधा. डोके उष्णतेने दुखते, थंडीमुळे दुखते, सर्दीमुळे दुखते, वातामुळे दुखते, अति कामामुळे दुखते, भुकेमुळे दुखते, गडबड-गोंगाटाने दुखते, पोट फुगल्याने दुखते, पित्त झाल्यामुळे दुखते, झोप अपुरी झाल्यामुळे दुखते की मानसिक ताणामुळे दुखते हे जाणून घेऊन त्याप्रमाणे उपचार करा.

अंगाला कंड सुटणे ही समस्याही वातावरणातील बदलामुळे वाढू लागली आहे. त्वचेला खाज कशामुळे येतेय हे आधी समजून घ्या. थंडीत त्वचा शुष्क होते त्यामुळे कंड सुटते. अंगावर पित्त उठल्याने खाज येते, उन्हाळ्यात सूर्याच्या तेज किरणांनी त्वचेवर अ‍ॅलर्जी येऊन खाज येते, काही वेळा खाद्यपदार्थामुळे खाज येते. पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास खाज येते. मादक पदार्थाच्या सेवनाने खाज येते, अंगाचा साबण किंवा सौंदर्य प्रसाधन बदलल्यामुळे खाज येते. खाज कशामुळे येते हे पाहून योग्य उपाय करा. जास्तीत जास्त पाणी किंवा सरबत यासारख्या द्रवपदार्थाचे सेवन करा.

हे पण वाचा - आपल्या शरीरा नुसार मिठाचे प्रमाण ठरवा व मीठ कोणते उत्तम आहे ते पहा !.

शरीर व मन तरतरीत ठेवण्यासाठी आळोखेपिळोखे देत शरीर सैल करा. काम करून आलेला थकवा, झोपेतून उठल्यावर आळसावलेले शरीर, एकाच ठिकाणी बसून काम करताना जखडून गेलेले शरीर किंवा काही काम नाही म्हणून आलेला कंटाळा घालवायचा असेल तर दिवसातून निदान ३-४ वेळा तरी उभे राहून मस्तपैकी आळोखेपिळोखे देऊन आळस काढून ताजेतवाने व्हा.



निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्या कडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. असे न केल्यास आपल्या आरोग्यास परिणाम होतो. रात्रीच्या जेवण्यात म्हणजे डिनरमध्ये काही गोष्टीना घेणं टाळणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. आज आम्ही आपल्या या लेखामधून सांगणार आहोत की आपल्याला डिनरमध्ये कोणत्या गोष्टी घेऊ नये. ज्या घेतल्यावर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. चला, तर मग जाणून घेऊया डिनर मध्ये काय सेवन करु नये.

 हे पण वाचा- संडास साफ न होण्याची कारणे

मसालेदार किंवा चमचमीत जेवण घेणं टाळा - 

डिनरमध्ये जास्त चमचमीत जेवण घेणं टाळावं. जास्त मसाल्याचं जेवण केल्याने पचनाशी निगडित समस्या उद्भवू शकतात. मसालेदार अन्न पचायला उशीर लागतो, यामुळे डिनर मध्ये मसालेदार अन्न घेणं टाळावं. 

 

चॉकलेट घेऊ नका - 

बरेचशे लोकं रात्री जेवणानंतर चॉकलेट खाणं पसंत करतात, पण रात्री चॉकलेटचे सेवन केल्याने आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडू लागतो. रात्री चॉकलेट खाल्ल्याने वजन वाढू शकतं.

 

ब्रोकोलीचं सेवन करू नका - 

ब्रोकोली आरोग्यास खूप फायदेशीर आहे, पण रात्रीच्या वेळी ब्रोकोलीचं सेवन करू नये. ब्रोकोलीत फायबर मोठ्या प्रमाणात आढळतं, त्यामुळे ब्रोकोलीला पचण्यासाठी वेळ लागतो.

 

तळलेले अन्न घेणं टाळा -

डिनरमध्ये फ्राईड फूड म्हणजेच तळलेलं अन्न घेणे टाळावं. रात्री तळलेले अन्न घेतल्यानं एसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास उद्भवू शकतो. रात्री हलके आणि सौम्य जेवण करावं.

 मोबाईल पावर बँक

https://amzn.to/2W9qJ0z

Buy on Amazon 





नूडल्स खाऊ नये -


रात्रीच्या वेळी नूडल्स खाऊ नये. हे खाल्ल्यास आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. नूडल्स नेहमीच मर्यादित प्रमाणात घ्यावं.

शरीरावर दाब येईल असे घट्ट, तंग कपडे वापरू नका. घट्ट कपडय़ाने रक्ताभिसरण व श्वासोच्छ्वास सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो, जिथे कपडा काचला जातो तेथील त्वचा काळी होते.स्वत: स्वत:ला ओळखा, स्वत:ची काळजी घ्या, स्वत:शी बोला, हे आपल्या आरोग्याशी

संबंधित आहे आणि आपल्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.

शरीराकडून येणाऱ्या नैसर्गिक सूचनांचा अनादर केल्यास शारीरिक पीडा सुरू होऊन क्षीणता येते. यापुढे निरोगी आणि स्वास्थ्यपूर्ण राहण्यासाठी शरीराच्या हाका ऐका आणि आजाराला लांब ठेवा

आयुर्वेद म्हणतो ‘‘आहार, निद्रा आणि अ/ब्रह्मचर्य’’ या कोणत्याही प्राण्याला जगण्यासाठी लागणाऱ्या तीन मूलभूत गरजा आहेत. यांनाच आयुर्वेदाने आपल्या देहाचे ‘तीन उपस्तंभ’ असे म्हटले आहे. यांच्या सम्यक योगानेच माणसाचा देह टिकून असतो. जरा विचार करून पहा वस्त्र आणि निवाऱ्याशिवायही माणूस जगू शकतो. पूर्वीही जगत होता. माणूस सोडला तर अजून इतर प्राणीसुद्धा याच्याशिवायच जगत आहेत. पण तुम्हाला कोणीही निद्रा आणि अ/ ब्रह्मचर्याशिवाय जगताना दिसणार नाही. प्रसिद्ध पाश्चिमात्य लेखकांनीसुद्धा हे मान्य करून नमूद केले आहे की ‘फुड, सेक्स, अँड स्लीप आर द थ्री बेसीक नीड्स ऑफ अवर बॉडी.’ आयुर्वेदात फक्त पुत्रप्राप्तीसाठी संभोग सांगितला आहे. इतर वेळी संभोग करण्यासाठी काही नियम व औषधीची बंधने घालून दिली आहेत. प्रथम ब्रह्मचर्य आश्रमाचे पालन करावयास सांगितले आहे.

हे पण वाचा -पोटातील गॅस दूर करा मेथीच्या दाण्याने


गृहस्थाश्रमात काही काल अब्रह्मचर्य व नंतर पुन्हा याचे पालन करायचे आहे. कारण शुक्र धातू हा सर्वात महत्त्वाचा धातू असल्याने त्याच्या नाशाने मृत्यूपण होऊ शकतो. म्हणून त्याचे बिंदू बिंदू स्वरूपात जतन करावयास सांगितले आहे. जास्त शुक्रनाश झाल्यास शरीराची व्याधी प्रतीकारक शक्ती कमी होते व मानवाला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आजकाल वेगवेगळ्या जाहिराती, बदललेली जीवनशैली, पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण यामुळे बरेच तरुण या शुक्रनाशाचे बळी पडत आहेत. स्त्रियांमध्येसुद्धा मासिक पाळी व तत् संबंधी तक्रारी वाढू लागल्या आहेत. नराश्य हे त्याचे प्रथम लक्षण आहे. कित्येक पाश्चिमात्य तरुणांना या आजाराने ग्रासले आहे. सत्तर टक्के आत्महत्या, बलात्कार, व्यभिचार, खून हे या शुक्रधातूशी संबंधित भावनांना आवर घालता न आल्याने होत आहेत. पण हे जगण्याचे मूलभूत साधन असल्याने आपण यापासून दूरसुद्धा जाऊ शकत नाही. म्हणून त्याचा सम्यक योग हेच आरोग्याचे व आनंदी जीवनाचे रहस्य आहे. सर्वानीच जर ब्रह्मचारी राहायचे ठरवले तर या जगात मनुष्य प्राण्याची पुढची पिढीच उत्पन्न होणार नाही व मानव जातच नष्ट होईल. तसेच इतर प्राण्यांचेही. म्हणून ग्रंथाला अ/ ब्रह्मचर्य अपेक्षित आहे व याचे महत्त्व ओळखूनच यास मूलभूत तीन उपस्तंभांत घेतले आहे. पण दुर्दैवाने आपल्या डोक्यात लहानपणापासून वेगळ्याच तीन मूलभूत गरजा शिकवल्याने सर्वाचा गोंधळ झाला आहे.



आपल्या शारीरीक समस्या आपल्या हद्दीत पूर्ण पणे नष्ट करण्याचे आपण कधी हि ठरवलेले च नसते..

पण ....अजून हि वेळ गेलेली नाही ,

म्हणून आता आपण व्यर्थ वेळ घालवू नये .

वेळ काढू पणा करू नये .

फक्त लक्ष देऊन वाचावे . पण वाचल्या नंतर आपल्या आरोग्य विषयक समस्यांबाबत र्निर्णय न घेता राहू नये

आजच्या भारतीयांचे आरोग्या ची गाथा .........................................

प्रत्येक ४ भारतीयात १ मधुमेही आहे किंवा मधुमेहाच्या वाटेवर आहे .

१५ करोड लोक स्थुलतेच्या व्याधीने त्रस्त आहेत

• त्यात ३० टक्के पुरुष व ५० टक्के स्त्रिया शहरी भागातील आहेत

• बालकांमध्ये हि स्थूलता वाढत आहे

भारतीय लोक हृदय रोगासाठी ६ पट प्रवण आहेत

या नंतर आजकाल एक तक्रार फार सामान्य झाली आहे

ती म्हणजे थकवा ------ ह्या मध्ये असे आढळून आले आहे कि ७० टक्के लोक हे पचनाच्या विकाराशी संबंधित असतात . त्यातील ५०% तर केवळ आहाराच्या पद्धतीत बदल करून व नियमित पोषक आहार घेऊन पूर्ण पणे ठीक होतात.

जागतिक आरोग्य संघटनेने निर्देशीत केलेले ५ जीवन पद्धतीचे विकार :-

क्र.२ चा मधुमेह ,हृदय विकार ,उच्च रक्त दाब ,झटका ,विशिष्ठ प्रकारचे क्षय रोग

स्थुलते मुळेच या ५ प्राणांना आमंत्रण मिळते

स्थूलता हि सामान्य रोग समस्या होऊन बसली आहे !

अतिरिक्त वजनाने होणारे आजार:- उच्य रक्त दाब, मधुमेह, संधीवात, पाठदुखी, दमा, हृदय विकार, ई.

लठ्ठ पणा हा केवळ आजार नसून इतर अनेक जीवघेण्या आजाराचे तो एक प्रमुख कारण आहे.त्याच बरोबर निद्रानाश,श्वसनाचे विकार,उच्य कोलेष्ट्रोलआदी समस्या हि त्यातून निर्माण होऊ शकतात,म्हणून लठ्ठ पणा पासून सुटका करून घेणे अत्यावशक आहे .

वजन वाढीची प्रमुख करणे :- *अवेळी जेवण ,*ताणतणाव ,*बैठ व्यवसाय कमी शारीरिक हालचाली ,*अपूर्ण झोप (झोप येत नाही म्हणणारे झोपेवर प्रेमच करतच नसतात ),*अतिरिक्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन ,*पोट साफ न होणे ,*थायरोईड ,*पाळीची अनियमितता *सतत औषधांचे सेवन. ई.

काही लोक व्यायाम करतात आणि मधेच सोडून देतात किंवा जिम सोडल म्हणून वजन वाढत नसते पण व्यायम सोडला ना ........

मग होणारा परिणाम म्हणजे वजनात वाढ . कारण एखाद्या नियमित पणाच्या कृतीची शरीराला सवय लागलेली असते म्हणून शरीर सिग्नल देत असते कि आता व्यायम करायची वेळ आली आहे .कमरेचा घेर ३५ इंचा पेक्षा जास्त असलेल्या स्त्रिया,आणि ४० इंचा पेक्षा असलेले पुरुष लट्ठ सदरात येतात .यांचा बी.एम.आय.(याचे विस्तृत वर्णन पुढे दिलेले आहे ) जरी धोक्याच्या पातळी च्या आत असला तरी यांच्या लठ्ठ पणाचा विपरीत परिणाम फुफुसावर होतो कारण जाड चरबी गोळा झाल्याने फुफुसाना प्रसरण पावण्यासाठी जागाच रहात नाही असे फ्रांस मधील संशोधनात आढळून आले आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी हाच अनेक प्रकारच्या क्षय रोगाचे मूळ असल्याचे तसेच चरबी मुळेच कामोत्तेजक संप्रेरके जास्त स्त्रवतात आणि याचा क्षय रोगाच्या उत्त्पन्नाशी फार जवळचा संबंध आहे असे अमेरिकेतील क्षय रोग संशोधन करणाऱ्या संस्थेला(AICR) आढळून आले आहे.

या सारख्या अनेक समस्या साठी नेमके काय केले पाहिजे ?

यासाठी हवे आता सर्वप्रथम आत्मचिंतन ......आपली आजची प्राणप्रिय जीवन शैली तपासून बघा

(अ)सकाळी उशिरा उठणे

(आ)निरधारित वेळेत निरधारित ठिकाणी पोहचण्यासाठी अत्यंत गडबडीत सर्व विधी आटोपणे, कारण प्रत्येक गोष्टीचे शास्त्र शुद्ध कारण माहिती करून घेणे आवशक वाटत नसते.महित असले तरी अमलबजावणी बाबत उदासिन्य

(इ) बैठ्या कामावर जोर किंवा बैठ्या कामाची सक्ती आणि रिकामा वेळ असलाच तर टी.व्ही.समोर बसूनच पहाणे .

(ई)जेवण्यात मसालेदार पदार्था वितिरिक्त खालींल गोष्टी खाण्यात भर (नको त्या गोष्टी करण्यावर भर )

मारामारीत मार (२) वेळ आली तर चप्पल (३) भांडताना दात (४) बोलताना शब्द (५) लिहताना ओळ (६) फिरताना प्रदुषित हवा

७) चालताना दम (८) बायकोचे बोलणे (९) केव्हा केव्हा-पैसा (१०) दुसऱ्याची लाच (११) नको तेथे उभे राहून (निवडणुकीत) आपटी (१२) जेवताना अनावशक् पदार्थ मर्यादे पेक्षा जास्त (१३) मनाचे मांडे (१४) कृत्रिम उत्तेजकता आणणारे पदार्थ (१५) नको तेथे कच

तरी हि मनुष्य अर्ध पोटी रहतो व भुकेने वखवख लेलाच असतो.(चिन्तनाचा भाग )

(उ कृत्रिम उत्तेजकता आणणारे पेय पिणे .

(ऊ) रात्री उशिरा पर्यंत जागरण करणे .

(ए) साधारणत:५० वर्षा पूर्वी माणसाला सरासरी २०० कि. धान्य वर्षाला लागत असे त्या साठी त्याला प्रचंड शारीरिक मेहनत पण करावी लागत असे. तर आज माणसाला सरासरी ३०० कि.धान्य वर्षाला लागते व शारीरिक मेहनतीचे प्रमाण मात्र कमालीचे घटले आहे.

(ऐ)सोबत ताण ,चहा,कॉफी,नशा आणणारे पदार्थ,धूम्रपान,गोड पदार्थाचे जास्तीचे सेवन.

याच गोष्टीची परिणीती उर्जेचा संचय न होता फक्त वजन वाढण्यात होत आहे.

आणि , सोबतीला सतत असणारा ..... मुख्य प्रश्न …(ताण)…….टेन्शन ….?

टेन्शन कोणी देत नसतो मात्र घेणाराच ते घेत असतो. चहा कॉफी व नशा आणणारे पदार्थ व धूम्रपान ह्या गोष्टी एवढ्या सामान्य झाल्या आहेत कि याला काही बंधने असू शकतात हि कल्पनाच करवत नाही. पूर्वी गोड पदार्थ फक्त सणावाराला च तयार होत असे आता मात्र याची विपुलता झाल्याने याला हि काही बंधने असू शकतात हि कल्पनाच करवत नाही.या साठी खालील आकृती चे निरक्षण करा.

untitled.PNGआकृती-अ ( नको तेथे उर्जेचा वापर झाला तर परिणामी उर्जेचा संचय कमी होतो व चरबी चा संचय म्हणजेच वजन वाढ, याचा परिणाम थकवा/निरुत्साह)

पूर्वी अन्नाचा दर्जा चांगला होता मात्र विपुलता नव्हती तर आता मात्र विपुलता वाढीस लागली आहे (रासायनिक खता मुळे व आधुनिकीकरणामुळे) दर्जा मात्र खुपच खालावला आहे

याचा परिणाम अधिक प्रमाणात रसायने व अशुद्ध घटकाचा भडीमार झाल्याने रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन शरीरातील रक्त वाहिन्या विशेषत: ह्रदयाच्या रक्त वाहिन्याचे, शुद्ध हृदय रोहिणी चे

रोहिणी विलेपि विकार व रक्त गोठलेली विलेपि रोहिणी असे प्रकार पहावयास मिळतात

म्हणजेच चुकीच्या बाजूचा प्रवास =अपघात.

निसर्गाच्या विरुध्द गेल्यास किमत चुकवावीच लागते , परिणामी वजन वाढते

तसेच याला बहुतांशी आपला नित्य आहार हि कारणीभूत आहे कारण जर आपल्या नित्य आहारात क्षार,शर्करा,चरबीयुक्त घटक ,उष्मांक ,व कर्बोदके यांचे प्रमाण जास्त असेल व जीवनसत्वें,प्रथिने,तंतुमय पदार्थ,पाणी याची कमतरता असेल तर वजन वाढण्यास मदत होते . रोज च्या आहार बाबत सामान्यत: सतर्क रहाणारेच आरोग्य पाळून आहेत ,तर बाकीच्यांचे आरोग्य बिघडण्यास निकृष्ट पोषक द्रव्ये बऱ्याच अंशी कारणीभूत आहेत.मग समस्या आहे कि जर आरोग्य निकृष्ठ पोषक द्रव्यामुळे बिघडते तर हि

निकृष्ठ पोषक द्रव्ये कोठून येतात ते पहा

( लोकांच्या आरोग्याचे काहीही होवो पण तर मालाला चांगली किंमत यावी यासाठी)

(१) सुंदर रंगा साठी ,

हानिकारक रंग व रसायने जसे कि शिसे ,पारा,( या मुळे ईकोलाय,सेल्मोनेल या ग्राम निगेटिव्ह ब्याक्टेरीया चे पोषण होते हे लहान मुलांसाठी फारच घातक ठरतात ),क्वापर सल्फेट हे कारले व पाले भाज्या हिरव्या गार दिसाव्यात म्हणून वापरतात.

(२) वांगे चमकदार दिसावेत म्हणून निकृष्ट दर्जाचे तेल चोळतात.

(३)गाजर लाल दिसावे म्हणून लाल रंगाचे पाणी वापरतात .

(४)कलिंगडाला इंजेक्शन देऊन लाल केले जाते.

(५)केळी व अंबा कार्बईड द्वारे पिकवली जातात.

(६)जिलेबीचा रंग माशे ताजे दिसावेत म्हणून वापरतात

(७)बोंबील चे तोंड लाल दिसावे म्हणून गुलाल लावतात,

आता जर वजन आवशक तेवढेच ठेवणे व सुदृढ रहाणे हा निश्चयच केला आहे तर लक्षात घ्या

शरीर बलवान व सशक्त ठेवण्या साठी सर्वात प्रथम हे पक्के जाणून घ्या कि,

डोके हे कपाट आहे. ह्या कपाटात काय ठेवायचे ते पक्के ठरवा .

या साठीच खालील गोष्टी नीट बारकाई ने बघा.

हे शरीर वाटेल तेवढे वाटेल तेव्हा खाण्यासाठी ,हवे ते हवे तेवढे करण्यासाठी नाही..ह्या शरीराची रचना व्यायाम,पोषक आहार,शिथिलता,या साठीच अनुकूल असताना आपण मात्र या विरुद्ध गोष्टी करून परमेश्वराने दिलेले निर्मळ शरीर आपण आपल्या सवयी ने खराब करत असतो.शरीराची नैसर्गिक प्रवृत्ती हि निरोगी राहण्याचीच असते आपण आपल्या प्रव्रत्तीने/सवई ने च त्याला विरोध करत असतो .सध्याचे हे युग हॉट युग म्हटल्यास वावगे होणार नाही. सध्या सर्वत्रच विद्युत चुंबकीय लहरींचे रेडीएशन चा धुमाकूळ असून दिवसेंदिवस प्रत्येकाच्याच सभोवती हॉट वातावरण आहे (अर्थात याला पर्याय हि नाही किंवा अत्यावशक असल्यामुळे म्हणा) ,पहा विद्युत उपकरणे,मोबाईल,स्वयंचलित वाहने ,खाणे-हॉट,पिणे-हॉट(किंवा कृत्रिम रित्या थंड केलेले )ऐकणे-हॉट संगीत (डी जे मोस्ट हॉट) ह्याचा सतत असलेला आपला संपर्क आपल्या न कळत आपल्या आरोग्यावर दुष्परीणाम करतच असतो सारांश निसर्गा पासून दुरावत चालल्यामुळे आपण हवे तसे आरोग्य महतप्रयासा शिवाय राखुच शकत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. नुसत्या मनपसंत च खाण्याचा कार्यक्रम केला पण खाल्लेले शरीरात काय परिणाम करते त्या नुसार आपण कृती नाही केली तर,

निसर्गाच्या विरुध्द गेल्यास किमत चुकवावीच लागते

शरीराला भरपेट खाण्याची आवशकता नसून संतुलित आहाराची गरज आहे .त्यासाठी सकाळी पोषक नाश्ता , दुपारी संतुलित आहार रात्री हलका आहार (हलका आहार म्हणजे – पचनास हलका )हेच पत्थ आहे. एक खाण्या नंतर दुसऱ्या खाण्याच्या वेळी बरोबर भूक लागणे हीच खाण्याची मर्यादा आहे. तर पैर गरम पेट नरम दिमाग थंडा हा सुदृढते चा पुरावा आहे.

*१०० वर्षाचे आयुष्य मनुष्य कमी कसे करतो……. तर फक्त दिनचर्ये ने*

(आहाराने,विचाराने,वागण्याने)

खाण्याच्या सवयी ह्या लहान पणा पासूनच नियंत्रित करायला हव्यात .आजकाल लट्ठ पणा हा लहान मुलात हि फोफावतोय ह्याला खाण्या पिण्याच्या सवई हे मुख्य कारण आहे .आपण लहान बालकांना सकाळी न्याहरी म्हणून बेकरी खाद्य देऊन मोठी चूक करत असतो.

*दीर्घायुषी व आनंदी जगायचे असेल तर सर्वगोष्टी/छंद/व्यायाम/योगासने/जोपासून स्वताची आदर्श दिनचर्या विकसित करून काटेकोर पणे आमलात आणावी. आपली दिनचर्या आवशक ते नुसार व सद्द्य परस्थिती व अवस्थे नुसार आवशक त्या प्रमाणे बदलत रहाणे आवशक असते. जसे कि समारंभात,प्रवासात,अथवा आपल्या असणारया विविध ठिकाणच्या वास्तव्या व गरजे नुसार काटेकोर पणे कसरत करावयास शिकणे हा निरोगी राहण्याचा पहिला व अत्यंत महत्वाचा धडा आहे.


सकाळी पोषक नाश्ता , दुपारी संतुलित आहार रात्री हलका आहार हेच पत्थ आहे. .

पथ्य म्हणजे शरीराच्या मर्यादा ,त्या समजल्यावर ताण येतो म्हणून शरीराला संतुलित ठेवावे .

वाईट सवयी मुळे शरीराला मर्यादा येतात म्हणून .शरीराला संतुलित ठेवणे आवशक .

ज्ञानामुळे पूर्ण नियंत्रण येते ताण रहात नाही. ज्ञान घेऊनच कृती करणे ईष्ट.

कृत्रिम भूक ओळखा .(मनपसंत पदार्थ समोर आल्यावर भूक नसते पण इच्छा होते ती कृत्रिम भूक)

भूक लागल्याशिवाय खाऊ नये लागल्यावर उपाशी बसू नये.

वरील ताण (टेन्शन) या प्रश्नाचे समर्पक उत्तर………. सावधानता.

बेसावध सावज टिपणे ज्या प्रमाणे सोपे असते तसे या शरीराच्या आरोग्याचे आहे अनेक व्याधी शरीरावर घाला घालण्यास तयारच असतात तेव्हा सावधानता म्हणजे नियमितता (खाणे पिणे व्यायाम ई.सवयी )निसर्गाच्या विरुध्द गेल्यास किमत चुकवावीच लागते.

बाहेरून स्वच्छ राहणे /दिसणे एक वेळ सोपे आहे पण आतील स्वच्छता म्हणजे अंतर्गत अवयवांची स्वच्छता राखण्यास शिकणे मात्र जरुरी आहे,आवशक्तेची भरपाई करणे,आवशक त्या घटकांचे रक्षण करणे, उर्जायुक्त रहाणे हीच सुंदरता आहे व हाच सावध पणा आहे .

हे लक्षात असु द्यावे कि शरीराला उर्जा हि फक्त आहारातूनच मिळते असे नाही तर सोबत निद्रा व साधना हि महत्वाची आहे.

येथे आहार म्हणजे पोषक आहार,निद्रा हि आवशक तेवढी झालीच पाहिजे, म्हणजे पडल्या बरोबर झोप लागणे व एकूण ६ते ७ तास शांत झोप होणे. व साधनेचा अर्थ आपण थोडक्यात सर्वांसाठी असा घेऊ कि जे काही आपले उदर निर्वाहाचे साधन आहे ते इमाने इतबारे चालवणे त्यात लांडी लबाडी न करणे,कारण त्यानेच ताण येण्यास सुरवात होते व आरोग्य बिघडण्यास येथूनच सुरवात आपल्या न कळत होत असते. शरीराच्या कुठल्याही भागास ताण तणाव म्हणजेच मनाला ताण त्यामुळे हमेशा शिथिल तेला (Relax) जोपासावे. शरीराच्या वेदनेने मनशांती भंग होणार नाही या साठी दक्ष असावे.एकच वेड डोक्यात नसावे शिथिल अवस्थेत रहाण्यासाठी बहुत्व प्रिय असावे (बहुत्व प्रिय =छंद /नाद/कला/उद्योग च्या समवेत असावे )नियमित व आवशक तेवढी झोप हा व्यायाम तर संतुलित आहार हा योग .

हे सर्व साधण्यासाठीच ...............व्यायाम हवा.

शारीरिक/आर्थिक/मानसिक सर्व दुःखा साठी व्यायाम सारखा उपचार नाही. शरीराच्या सर्व अवयवांना व्यायाम (मन,+ ईतर सर्व अवयव ).

शरीराच्या व्यायाम सुरु करण्या पूर्वी मनाचा व्यायाम करणे अत्यावशक .

मनाचा व्यायाम म्हणजेच मनाचा निर्धार

मनाचा निर्धार करण्यासाठी आवशक गोष्टी----

(1)राग व्देष हे शरीराला आतून जळतात तर भक्ती (संबंधित विषयाचे प्रेम) आतून शीतलता निर्माण करते. त्या मुळे जे काही करावयाचे आहें ते श्रद्धा युक्त अन्तकरणाने केले तरच उद्दिष्ठ साध्य होते म्हणून पूर्ण माहिती,ज्ञान ,घेऊनच कृती करावी .

(2) दु;खा मुळे जी मानसिकता होते त्या मुळे शरीर कमजोर झाले हि मानसिकता वाढू देऊ नये.

(3)काटा घुसताना व बाहेर काढताना त्रास होतो तसे दुखणे कमी होताना देखील त्रास होतो. तर काही दुखणी अजिबात महत्व न देता आपोआप कमी होतात ,बी पेरल्यावर थोडा धीर धरावा लागतो एवढेच.

(4) मनात काहीही येऊ द्या पण त्याचा परिणाम होऊ नये याची काळजी घेणे आपल्या हातात जरूर आहे.

(5) भीतीने सर्वात जास्त शक्ती संपते. घाबरण्यानेच सर्व आजार होतात व बळावतात त्यावर उपाय म्हंणजे वीर पुरुषांच्या कथा वाचत रहाणे.

(6) कुठलीही व्याधी एकदम जडत नाही आत्मपरीक्षण करा कारण समजेल उपाय सुचेल

(7) चुकीचा विचार चुकीचे वर्तन ह्या मुळे मानसिक व नंतर शारीरिक रोग जडतात तेव्हा योग्य विचार करण्याची मनाला तर योग्य वर्तन करण्याची शरीराला सवय लावण्यासाठी सत्संग हाच उत्तम उपाय आहे

(8) मनाचा /विचारांचा संबंध श्वासाशी आहे तो नियंत्रित झाला म्हणजे आरोग्य लाभते,तेव्हा सकारात्मक विचार हेच खरे विचार हे मनाला हमेशा बजावून सांगावे. कारण,

(9)आपल्या मेंदू मध्ये हमेश्या संप्रेरके स्त्रवत असतात मात्र नकारात्मक विचाराने जी मेंदूत संप्रेरके स्त्रवतात त्यानेच नैराश्य येते तर सकारात्मक विचाराने जी संप्रेरके स्त्रवतात त्यानेच उत्साह वाढतो,कार्यक्षमता वाढते

शारीरीक व्यायाम व संतुलित व्यायामाचे महत्व

(1) शस्त्र गंजू नये म्हणून धार लावतात तसा शरीराला व्यायाम हवा .

(2)शारीरिक दुर्बलतेमुळे आपण कंटाळा करत असतो .

(3) व्यायाम /योगासने सुरु करे पर्यंत कंटाळाच असतो मात्र सुरु झाल्यावर शरीरात जे बदल होतात त्याने मन वरवर प्रसन्न होत जाते व पटते कि हे मी फार पूर्वीच सुरु करायला हवे होते त्यामुळे चला उठा व सुरुवात करा

(4) काहीच घडत नसेल तर सर्वात सोपा व्यायाम म्हणजे रोज किमान ४ किमी चालावे.

(5) योगासने/व्यायाम हे लायसन आहे लायसन धारी कोणाला भितात ? यांची व लायसन नसणाऱ्यांची मानसिकता यातील फरक बघा

(६) हे सर्व उपाय करायला पैसा लागत नाही

निरोगी व बलवान शरीर साठी नियमितता ,सातत्य ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.

आता व्यायामाची व खाद्य पदार्थाच्या परिणती चे अवलोकन करा

१ छोटा समोसा पूर्णत: पचवण्यास १ तास चालावे लागते

1 प्लेट फ्रूट केक किंवा पकोडा पूर्णत: पचवण्यास १/२ तास पोहावे लागते

1 जाम ब्रेड पूर्णत: पचवण्यास १ तास सायकल चालवावी लागते

1मसाला डोसा पूर्णत: पचवण्यास १ तास आरोबिक चालावे लागते .

१ किलो वजन कमी करण्यासाठी ८००० .कॅलरीज खर्च कराव्या लागतात.

वजन कमी करण्यासाठी काही लोक व्यायाम करतात,व्यायामाने भूक लागली कि जास्तीत जास्त कार्बोदके असलेले अन्न घटक सेवन करतात आणि व्यायामाने गमावलेली चरबी पुन्हा भरून काढतात व म्हणतात कि व्यायाम करून सुद्धा फारसा फरक पडला नाही .तर दुसऱ्या प्रकारात लोक लंघन (dieting) करतात त्यामुळे उर्जेची पातळी खालावते मग खूप भूक लागली म्हणून जास्त कार्बोदके असलेले असलेले अन्न घटक सेवन करतात आणि गमावलेली चरबी पुन्हा भरून काढतात मग नेमके काय केले पाहिजे..........

तर....आहारात आवशक त्या घटकाचा समावेश करून तो आहार दिवसातून ३ भागात विभागून घ्यावा ज्याने भूक नियंत्रणात राहून उर्जेची पातळी उंचावते व परिणामी वजन संतुलित राहते .

आपल्याला विविध खाद्य घटकातून मिळणाऱ्या उष्मांकाचा तक्ता(कॅलरी मध्ये) फार महत्व पूर्ण आहे तो जरूर अभ्यासावा


शरीरातील पेशींची संख्या १०००००००००००० =(१० चा १२ वा घात) आहे .आपल्याला दीर्घायुषी ,निरोगी,आणि जोमदार आयुष्य जगायचे असेल तर आपल्या पेशींचे आरोग्य अत्यंत महत्वाचे ठरते .कारण आपल्याला विचार करण्यासाठी ,ते वाढण्यासाठी लागणारी सर्व शक्ती पेशिद्वारे पुरवली जाते .म्हणजेच पेशी निरोगी नसतील तर आरोग्य चांगले राहूच शकत नाही. दिवसाच्या आहारातून आपल्याला उर्जा मिळते जी कि आहार घटकातून मिळते या मध्ये चरबी युक्तघटक, कर्बोदके, प्रथिने,असतात. रात्री पोषक द्रव्यातून पेशी व स्नायू पुनर्स्थापित होतात. आणि सकाळी गरज असते कशाची ? तर

सर्व अवयवांना सुरक्षित पणे कामाला लावणारा आहाराची .

कोणते अवयव ?

सर्वात महत्वाचे स्वादुपिंड

स्वादुपिंडा चे कार्य –(१) मागील २४ तासात खर्च झालेली उर्जा पुनर्स्थापित करणे

(२) शरीराला आवशक असणाऱ्या घटकाचा जो रात्रीतून क्षय होतो तो पुनर्स्थापित करणे

(३) शरीराला आवशक तो पाणी साठा नियंत्रित करणे

(४) रक्त शर्करा नियंत्रित करणे

• आधुनिक न्याहरी ची पद्धत ---- कर्बोदकांचा भरणा असलेला नाश्ता तसेच संतुलित नाश्ता म्हणून घेण्यात येणाऱ्या नाश्त्यात हि कर्बोदकांचा जास्तीचा भरणा असणे किंवा मुळीच नाश्ता न करणे .

आपला नाश्ता हा साधारण पणे कर्बोदके असणारा असतो त्यामुळे रक्त शर्करेची पातळी एकदम वाढते ज्यामुळे इन्सुलीन चा स्त्राव हि वाढत जातो व रक्त शर्करा कमी करतो परंतु अतिरिक्त इन्सुलीन चा स्त्राव हा चरबी वाढवण्यास सहायकारी ठरतो.व रक्त शर्करा नियमित पातळी पेक्षा कमी करतो परिणामी भुकेची भावना वाढवतो.अशा प्रकारे हे दुश्चक्र दिवसातून २-३ वेळा पूर्ण होते आणि हेच कारण मधुमेह,उच्य रक्त दाब,वजन वाढणे यास करणी भूत होतो.तर जेव्हा नाश्ता न करता २ वेळेस फक्त जेवणच केले जाते त्या प्रकरणात सकाळी जेवणाच्या वेळेस रक्त शर्करेची पातळी खुपच खाली गेलेली असते त्यामुळे तीव्र भूक लागलेली असते व उत्साह आणि कार्य क्षमता दोन्हीही घटलेली असते.तेव्हा भूक भागवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या अन्न घटकात कार्बोद्कांचेच प्रमाण जास्त असल्यामुळे रक्त शर्करेची पातळी ताबडतोब वेगाने वाढण्यास सुरवात होते परिणामी इन्सुलीन चा स्त्राव हि वाढत जातो व रक्त शर्करा कमी करण्याचे काम सुरु करतो व अतिरिक्त इन्सुलीन चा स्त्राव हा वरील प्रमाणेच चरबी वाढवण्यास सहायकारी ठरतो आणि हेच कारण मधुमेह,उच्य रक्त दाब,वजन वाढणे यास करणी भूत होतो.येथे हे लक्षात घेतले पाहिजे कि नाश्ता न करणाऱ्याचे स्वादुपिंड लवकर अकार्य क्षमते कडे वळू शकते त्यामुळे आपला आहार किमान ३ विभागात विभागून घेणे फार गरजेचे असते. एकंदरीत आपल्याया एक अशा प्रकारच्या नाश्त्या ची ,भोजनाची आवशकता असते कि जो प्रमुख जीवन सत्वे आणि उर्जा युक्त आहे व जो रक्त शर्करेची पातळी व इन्सुलिनची पातळी नियमित राखतो.या मुळे कार्बोद्काची आवशकता भासत नाही व भूक नियंत्रणात रहाते. व सतत खाण्याची जी भावना होते ति या मुळे नष्ट होते.व उत्साही व कार्यक्षम रहाण्यासाठी शरीरातील चरबी उपयोगात आणली जाते.अशा प्रकारे मधुमेहाचा,उच्य रक्त दाबाचा,व वजन वाढीचा धोका फारच कमी तो व पूर्वीची आकृती –अ स्थितीचे रूपांतर परिपूर्ण परस्थितीत आकृती –ब प्रमाणे व्हावयास हवे

म्हणून योग्य वेळी योग्य आहाराची व ते योग्य निचरा होण्याची आवशकता लक्षात घेतली पाहिजे

सु प्रभाती शरीराला अनेक पोषक जीवन सत्वाची आवशकता असते !

विचार करा, आपण काय देत असतो तर केवळ अत्यंत कमी पोषक सत्व युक्त घटक असलेला आहार .तेव्हा खालील सूत्र बघा .

सुदृढ शरीर व जीवन = संतुलित पोषक आहार + वेळेवर खाणेपिणे + नियमित व्यायाम + आराम आणि शिथिलता (RELAXATION)

आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरवात करणार आहोत

आपण आता आपल्या प्रगतीचा आलेख तयार करणार आहोत तो आपल्यालाच मार्गदर्शक म्हणून वापरण्या साठीच.तेव्हा जर आपण या पूर्वी आरोग्यासाठी काहीच केले नाही (जाणून बुजून नव्हे तर इतर व्यापामुळे वेळ मिळाला नाही किंवा काहीच माहित नसल्यामुळे म्हणा)असे समजून शून्या पासून सुरु करू या

आता सर्व साधारण तपासणी

आपल्या शरीराला उंची असते आपली किती आहे..................? .......

आपल्या शरीराला वजन असते. आपले वजन किती आहे…...? .....

(उंची नुसार आपले वजन तपासा (से.मी. व कि.ग्रा.मध्ये )

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषां नुसार आपली आजची शारीरिक स्थिती जाणून घेऊ या.परस्थीती ला खात्रीशीर उपाय हि जाणून घेऊ या.

आता आपले वजन हे उंची नुसार जास्त आहे अथवा कमी आहे तर,

अंतर्गत अवयवांची व एकूण शरीरातील चरबीच्या प्रमाणाचे विश्लेषण बारकाईने तपासा

(१) - म्हणजे शरीराच्या अंतर्गत अवयवा भोवती असणारी चरबी. हि २ ते ८ एकक असायला हवी आपली किती आहे ?

९ते १४ हि जास्त तर १५ पेक्षा जास्त असेल तर जोखीम आहें.

(२)  - पोटाभोवती ची चरबी . हि १५% पेक्षा कमी असावी कारण

१६ ते १८ हि जास्तीची तर १८ पेक्षा जास्त जोखिमेची असते

(३) शरीरातील एकूण चरबीचे प्रमाण. हे पुरुषांमध्ये १०ते २० तर स्त्रिया मध्ये २० ते ३० असावे पुरुषात २०ते २५ आणि स्त्रियात ३१ ते ३५ हे जास्तीचे तर त्या पुढील जोखीमेचे असते.

(४)  -शारीरिक वय ,प्रत्यक्ष वय व शरीरातील अवयव कार्य करत असलेले वय या मध्ये फरक नसावा .

(५) -शरीरच्या उंचीचे वजनाशी असलेले गुणोत्तर हे २० ते २३ असावे कारण, १८ पेक्षा कमी असेल तर खाण्याची भीती वाटत असते म्हणून न खताच रोड होतात किवा उलटी होते म्हणून रोड होतातकिवा क्याल्शियम क्षय होत असल्याने हाडे नाजूक होतात तर १८ ते २० ज्यांचा आहें त्यांना पचन शक्तीचे विकार, अशक्त पणा,कमालीचा थकवा,ताण,धड धड होणे अवयवांची असुरक्षित कार्य प्रणाली असते

२३ ते २५ हा जास्तीचे वजन या प्रकारात असल्याने यांना थकवा,पचनाचे विकार,अभिसरणविकार,होऊ शकतात .

२५ ते २८ हा गट स्थूलता १ या प्रकारात येतो ह्याना मधुमेह,उच्य रक्तदाब,हृदय विकार, रक्ताच्या गुठळ्या होणे,झटके,आघात,सांधे दुखी,संधीवात,मेरुदंडाचे विकार, होऊ शकतात.

२८ ते ३० हा गट स्थूलता २ या प्रकारात येतो ह्यांना मधुमेह,क्षय रोग,हृदय विकाराचा झटका,आघात, रक्त वाहिन्यांचे विकार,(गलशोथ,निलाशोथ,धमनी कन्ठीय,) इ.प्रकार होऊ शकतात .

३० पेक्षा जास्तीचे लोक स्थूलता ३ या प्रकारात येतात त्यांना मधुमेह,क्षय रोग,हृदय विकार,व अकाली मृत्यू चे जास्तित्त जास्त जोखीम असू शकते.

(६) BMR याला चयापचयाचा वेग असे म्हटले जाते यावरून एकाद्या शरीरात किती उष्मांक पचवले जाऊ शकतात व किती उष्मांकाचे कार्य ह्या शरीरा कडून होऊ शकते हे ठरते हा वेग पुरुषांसाठी २००० कि.कॅलरी ,तर स्त्रिया साठी १८०० कि. कॅलरी एवढा असावा.

(७) MM स्नायू बळ हे पुरुषांसाठी ३३ते ३६% तर स्त्रियांसाठी ३० ते 33% असावे.


तपासणीत जर आपले शरीर जागतिक निकषां नुसार दोष युक्त आहे तर उपाय हि करायला हवेच म्हणून आपण व्यायाम व पोषक आहारानेच तो दोष काढून टाकण्याचे आज पक्के करत आहोत ,मग .... अन्न व पोषक आहार काय आहे ?

जे आपण भूक असताना व नसताना हि खातो ते अन्न!

निरोगी रहाण्यासाठी शरीराची दैनंदिन गरज म्हणजे पोषक आहार

पोषक आहारच का ?

ज्या मुळेच .…शरीराची वाढ व विकास होतो ,रोग प्रतिकारक शक्ती वाढते ,विषारी व निरुपयोगी घटकाचे उत्सर्जन होते ,वयाचा शारीरिक समतोल राहतो,उत्साह व जीवनशक्ती वाढते ,एकंदरीत परिपूर्ण आनंद ! या साठीच पोषक आहार आवशक.

संतुलित पोषक आहार काय आहे? निरोगी रहाण्यासाठी पुरेसे पोषकद्रव्ये आहारातून घेणे हा संतुलित पोषक आहार आहे

दैनंदिन आवशक पोषक द्रव्ये :- प्रथिने ,जीवनसत्वे व क्षार ,कर्बोदके ,आवशक चरबीयुक्त घटके ,तंतुमय पदार्थ ,वनौषधी ,पाणी ई.

•प्रत्यक्षात ,संतुलित पोषक आहार = वैज्ञानीक तेने परिपूर्ण का असावा ते पहा ,(तो तसा बनवून घेणे तसे पहाता अतिशय अवघड आहे)

*जिवंत राहण्यासाठी शरीराला प्रथिने ,पिस्टमय पदार्थ ,चरबी,जीवन सत्वे, आणि खनिज द्रवे लागतात परंतू जोमाने वाढण्यासाठी एन्टीऑक्सीडटस्,वनस्पतीजन्य पोषकद्रव्ये आणि प्रत्येकाच्या शरीराला त्यांच्या गरजा प्रमाणे इतर पूरक गोष्टी लागतात .पुरेशी पोषण मूल्ये असलेले अन्न जर रोज खाता येत नसेल तर संतुलित पोषक आहार आपले काम हलके करते व ते हि आरोग्य पूर्ण रीतीने . *आपल्या शरीरा मध्ये अगदी पेशी च्या पातळी पर्यंत पोषक द्रव्याचे पूर्ण पचन व्हावे ,अशुद्ध पदार्थ काढून टाकता यावे ,आणि आपल्या सर्व शक्तीनिशी सहज आणि यशस्वी रित्या वावरता यावे अशा दृष्टीने वजन नियमन पोषण आणि शक्ती व तंदुरुस्ती देणारी पोषक द्रव्ये संतुलित पोषक आहारातून मिळत असतात.

*पेशींचे पोषण हि संकल्पना अगदी साधी आहे विज्ञानाचा वापर करून तयार केलेले संतुलित पोषक आहार निरोगी विली ना (सुक्ष्मकारक आकाराच्या आतड्याच्या भित्तीके लगत असणाऱ्या पेशी .या द्वारपालाचे काम करतात ) मदत करतात आपल्या शरीराला अधिक पोषक द्रव्ये ,जीवन सत्वे आणि खनिज द्रवे शोषून घेण्यास तसेच अपायकारक पदार्थापासून संरक्षण देण्यास मदत करतात .

आपल्या विली जेवढ्या निरोगी राहतील तेवढे पेशींना लागणारे पोषण अधिक कार्यक्षमतेने शोषून घेतले जाते व आपण निरोगी होतो .

*विज्ञानातील अत्याधुनिक शान्शोधन आणि अत्यंत आरोग्यदायी पोषक द्रव्यानीच,वनस्पतीजन्य पोषक आहाराने पेशींचे पोषण होते शरीराला प्रती ऑक्सिडेषनाची सुद्धा आवशकता असते.

(सर्व सजीवांना ऑक्सिजन हा महत्वाचा घटक आहे.चयापचया साठी व जिवंत राहण्यासाठी जी उर्जा लागते ती घेतलेल्या आहारातून मिळवण्यासाठी ऑक्सिजन ची आवशकता असते.ज्या रासायनिक क्रियांमुळे चरबी,प्रथिने,कर्बोदके यांच्या चयापचया तून जी उर्जा मिळते त्या रासायनिक क्रिया ऑक्सिजन मुळेच व्यवस्थित पार पडतात.परंतु ऑक्सिजन हा दु धारी तलवारी सारखा आहे कारण ऑक्सिजन चा रेणु हा सहज मुक्त होत असल्याने,हा मुक्त रेणु विविध किमान ५० लहान मोठ्या आजारांना कारणीभूत होऊ शकतो म्हणून प्रती ऑक्सिडेषनाची आवशकता असते .)

• उच्य प्रतीचे पचनावाशक तंतुमय घटक Dietary Fiber सुद्द्धा नियमित सेवन केले पाहिजेत

• (डाएटरी फायबर म्हणजे नैसर्गिक भाज्या व भरडा(कोंडा)युक्त असा तंतुमय असतो जो मुखावाटे थेट जठरात जातो व पचनास जड असणाऱ्या विविध घटकांचे पचन होण्यास सहाय्य करतो याच्या अभावी बध्दकोष्टता होऊ शकते .)

• पोषक आहार हा कमी उष्मांक,चरबी घटक व सोडियम युक्त असावा

• प्रती दिनी २५ ग्राम सोया प्रोटीन घ्यावे जो कि एक कमी चरबी,कमी कोलेस्ट्रॉल,असलेले आहार आहे ह्यामुळे ह्र्दय विकारची शक्यता कमी होते

प्रथिने – आहारावर नियंत्रण ठेवण्यास मदत आणि सडपातळ शरीरयष्टी राखणारी असावीत , आरोग्यदायी फळे व भाज्या बरोबर प्रथिने खाल्यास भूक कमी लागते आणि आहार संतुलित होऊन वजनाचे नियमन होते . आपण पुरेशी प्रथिने नाही खाल्ले तर आपले शरीर स्नायू व अवयवातून प्रथिने शोषून घेते .

*तंतुमय पदार्थ (डाएटरी फायबर ) पचन क्रिया सुलभ करण्यास मदत करते व चरबीचे शोषण कमी करते तेव्हा असा आहार बनवणे व घेणे अतिशय अवघड आहे परंतु हल्ली बाजारात बरीच उत्पादने या साठी उपलब्ध झाली आहेत यासाठी चाचणी असी आहे कि ज्या उत्पादनातून शरीरात तेल,अनावशक क्षार,मसाले,रसायने,कर्बोदके कमी जातील व जीवनसत्वे ,आवशक क्षार,प्रथिने,तंतुमय पदार्थ,पाणी जास्त जाईल,उष्मांक पुरेसे असतील,अशीच उत्पादने निवडावीत मात्र सत्यता व शुद्धता तपासून मार्गदर्शकाच्या सहायाने घेणे च इष्ट असते या साठी एकंदरीत ,

आपले आरोग्य राखणे हे काम न होता ती एक जीवन शैली बनायला हवी. हेच सूत्र पाळले गेले पाहिजे.

काही लोकांना वजन कमी असणे हि समस्या असते येथे सुद्धा पेशिंचीच भूमिका महत्वाची असते कारण पेशी सशक्त नसल्यामुळे त्या आवशक ते घटक पुरेश्या प्रमाणात शोषण करून साठवून ठेउच शकत नाही परिणामी वजन न वाढता घटतच राहते तेव्हा पेशिंचे पोषण होऊन सशक्त होण्यासाठीच पोषक आहार अत्यंत आवशक आहे. महत्वाचे पुन्हा सांगावेसे वाटते ते म्हणजे ,

भूक लागल्याशिवाय खाऊ नये लागल्यावर उपाशी बसू नये.

*पाणी किती व कसे प्यावे?*

आपले वजनाला २० ने भागावे येणाऱ्या संखे एवढे लिटर पाणी किमान प्यावे . जेवताना शक्यतो पाणी पिऊ नये, जेवणानंतर ३० ते ४० मिनिटांनी आवशक तेवढे पाणी प्यावे . रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते सकाळी मुखमार्जन झाल्यावर घेवूनच शौच विधी आटोपावा.याने शारीरिक उष्णता कमी होण्यास मदत होते (गाढव सर्वात शुध्द पाणी पिते म्हणून कृत्रिम शीत पेये पिऊ नयेत.जे गाढव करत नाही निदान ते तरी माणसाने करू नये ).रात्री पाणी कमी प्यावे . या साठी जी पद्धत आपण दह्यातून लोणी काढण्यास वापरतो तसेच पोटाचे आहें हे लक्षात ठेवावे .सतत काळजी,धास्ती,अति राग,अति काम विचार याने रक्त गरम होते हे गरम रक्त शरीरातील अनेक अवयवांची कार्यक्षमता खराब करत असते अश्या वेळी पाणी पिलेले सुद्धा गरम होते व ते सुद्धा अवयवांच्या कार्यक्षमते मध्ये बाधा आणणाऱ्या रक्ताचे तापमान कमी करण्यास मदत न करता गरम पणा जास्त वेळ ठेवण्याच्या कमी मदत करते तेव्हा वरील मूड मध्ये पाणी पिऊ नये थोडे डोके शांत होते ,घाबरणे संपते ,राग निवळतो ,तेव्हाच खाली बसून हळू हळू ग्लासाला तोंड लावूनच पाणी प्यावे,वरून पाणी पिऊ नये . वरील अवस्थेतील गरम रक्त शरीरातील उष्णता वाढवण्याचेच काम करते. जर हा प्रकार वाढतच गेला तर गरम खाल्यावर किंवा तिखट खाल्ले तर त्रास होऊ शकतो त्यामुळे हमेशा शरीराचे म्हणजेच रक्ताचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी डोके शांत ठेवणे व त्या साठी झोपेच्या वेळी झोप,जेवण्याच्या वेळी जेवण भांडणाच्या वेळीच भांडण.थोडक्यात जी क्रिया करावयाची जी वेळ आहे त्याच वेळी ती केली पाहिजे कोणत्याही क्रियेची वेळ दुसऱ्या क्रियेसाठी खर्च होता कामा नये . हेच साधे व सुखी जीवन आहे.

आता बाहेरून सुंदर व ताजे तवाने रहाण्यासाठी अकाली वृद्धत्व कोणालाही नको असते.त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. तो पोषक द्रवे शोषून त्याचे एकत्रीकरण करत असतो .त्याच बरोबर अपायकारक पदार्थ हि शोषून घेत असते .हिवाळ्यात त्वचेचे सूर्यापासुन संरक्षण केले नाही तर त्वचेच्या केंन्सर ची शक्यता वाढते . तेव्हा त्वचे साठी वापरण्यात येणारी घटके हि नैसर्गिकच असावीत ,रासायनिक द्रव्यांचा भरणा असणारी निश्चितच हानिकारक ठरतात तेव्हा सावधानतेने व दक्ष राहूनच त्वचेचे आरोग्य सांभाळावे .

आपल्या ऋषी मुनी नी सांगितलेच आहें कि ,संपत्ती आरोग्य नाही .

मनाला स्थिर करणे हेच आरोग्य आहे. आणि आरोग्य हीच संपत्ती आहें.

तुम्ही जर ठरवून निश्चित कृती केली तर होणाऱ्या परिणामाने तुम्ही भारावून जाल व म्हणाल

जे माझे हरवले ते माझ्यातच मला सापडले

शरीराला आवशक तसे राखणे म्हणजे आरोग्य सांभाळणे . देहाला त्याच्या मार्गाने जाऊ न देणे म्हणजे आरोग्य गमावणे (अनारोग्य)

काही प्रश्न ?

(१)असा आहार किती दिवस घ्यावा लागेल

आपले शरीर जागतिक निकषा नुसार यथायोग्य झाले व नंतर जर आपण काटेकोर पणे पोषक आहार घेऊन नियंत्रण ठेऊ शकत असलो व सोबत व्यायाम,व आवशक ते सातत्य राखत असाल तर हा विचार करावा. परंतू शरीराला हि एक चांगली सवय लागल्यामुळे उर्जेची पातळी कल्पनेपेक्षा उंचावते व आपली कार्यक्षमता कमालीची वाढते त्यामुळे तुम्ही असा आहार वापरणे बंद करावे हि कृती मनात आली तर तुम्हीच हे विचार खोडून टाकताल .

(२) कल्पना निश्चितच चांगली आहेत पण खर्चाचे काय ?

जर आपल्याला खरेच वजन कमी करणे अथवा वाढवणे आहे तर खालील कमीत कमी गोष्टी कराव्याच लागतील

१. पोषक नाश्ता व पोषक आहार --- ज्या मध्ये सूप,मोड आलेले धान्य,चांगली प्रोटीन्स, कच्या भाज्या,फळे ,दुध,उत्तम प्रतीच्या धान्याचे जेवण इ.किमान लागेल

आजच्या बाजार भावाने एका व्यक्ती साठी किमान किमत यात वाहतूक खर्च ,इंधन खर्च,शारीरिक श्रम,व आपला वेळ वगळून जरी केला तर किमान किती रु प्रती दिनी लागतील? तर आजारी पडून त्यावर उपाय करण्यात खर्च होणारा वेळ ,त्रास,पैसा व शारीरिक कमजोरी मुळे आपल्या नित्य नौकरी अथवा धंद्यातील नुकसान या पेक्षा निश्चीतच कमी खर्च येईल

थोडक्यात, प्रश्न सोडवण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून दक्ष (वर उल्लेखिलेली सावधानता)असावे

आता आपण हे पक्के ठरवले पाहिजे कि माझ्या डोकेरूपी कपाटात मी आज वाचलेले मोल्यवान विचाराच जतन करून त्याची अमल बजा वणी साठी कटिबद्ध राहील ????????



शरीरात घेतलेला आहार व्यवस्थित निचरा न झाल्यासच(व्यामाम व नियमित पणा नसल्यास) चरबी साठते. त्या मुळे कोणते पदार्थ कोणी किती खावे हे प्रत्येकाच्या व्यायाम ,नियमीत पणा या नुसारच असते. कारबोद्काचे मुख्य २ प्रकार आहेत १.संथ –ज्या मध्ये कोंडायुक्त/तंतू युक्त पदार्थांचा समावेश असतो जसे कि ज्वारी,गहू,बाजरी.इ.२.जलद- ज्या मध्ये तंतू विरहीत पदार्थ जसे कि,बिस्कीट,बेकरी पदार्थ इ.शारीरिक मेहनतीचे काम करणाऱ्यांनी जलद कर्बोदके जास्त घेतल्यास चालू शकते.तळलेले पदार्थ नाश्ताम्ध्ये अधून मधून घेतल्यास चालू शकते.थोडक्यात हे लक्षात असू द्यावे कि जे पदार्थ शरीरात लवकर शोषले जातात त्याने चरबी साठत नाही तेला पेक्षा गावरान तूप आहारात असल्यास उत्तम.



सुंदर आयुष्य जगण्यासाठी नक्की काय मिळवायचं हेच लोकांना कळत नाहीये. एका छोटय़ाशा घरासाठी आणि वितभर कपडय़ासाठी माणसाने आहाराकडे दुर्लक्ष केलं. दिवसरात्र जागून काबाडकष्ट करून माणूस घर आणि वस्त्र विकत घेऊ लागला. साठवू लागला. आज आमच्याकडे कित्येक रुग्ण येत आहेत ज्यांच्याकडे मुबलक वस्त्र व सुंदर घर आहे मात्र त्यांना कधीही झोप लागत नाही. निद्रानाश झाला आहे. कित्येकांना झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही, मग पुढे जाऊन गोळी घेऊनही झोप लागत नाही आणि मग अनेक नको असलेले आजार मागे लागतात. आता झोपेसाठी ते सर्व मिळवलेली संपत्तीसुद्धा खर्च करायला तयार असतात. अगदी वेडे बनतात. अनिद्रा ही वात व पित्त अशा दोन्ही दोषांना वाढवते व बिघडविते. सगळी सुखे निद्रेच्या आधीन आहेत. आहार बिघडला की झोप बिघडते, झोप बिघडली की शुक्रधातूची दुष्टी होते आणि हे तीन मूलभूत घटक बिघडले की आरोग्य बिघडते. सकाळी लवकर उठून रात्री लवकर झोपणे, नियमित व योग्य वेळी आहार घेणे, सम्यक ब्रह्मचर्य पालन करणे हीच खरी निरोगी आयुष्याची त्रिसूत्री आहे. सततची अनिद्रा विस्मरण निर्माण करते. म्हणून वैद्याच्या सल्ल्याने जायफळ दुधात उगाळून घेणे, जटामांसी फांट, ब्राह्मी, सर्पगंधा अशा आयुर्वेदातील अनेक औषधी प्राकृत निद्रा येण्यासाठी मदत करतात. ज्यांना कित्तेक दिवस निद्रानाशाने पछाडले आहे त्यांच्यासाठी तर शिरोधारा हे पंचकर्म एक वरदानच आहे.




एक दिवसाचा निद्रानाश हा पुढच्या दिवशीच्या निद्रानाशाचे कारण बनतो.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी? लसूण चे फायदे

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी*? लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. लसूण अन्नाचा स्वाद वाढवते. पण याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहे. आयुर्वेदात देखील लसणीचे महत्व सांगितले आहे. कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा.  कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे. लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते. हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.  लसणीमधील पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च ...

वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम

 *वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम*  खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे. ♦ *हे आहेत दुष्परिणाम* ♦ ✅ 1. *वजन वाढते*  वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते. यामु फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. ✅ *2. चक्कर येणे*   भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते. ✅ *3. तणाव *  भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो. 22 ✅ *4. अन्य आजार *  वजन घटवायचे असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतराने खात राहा. अन्यथा विविध आजार शरीरात शिरकाव करू शकतात. ✅ *5. लठ्ठपणावर नियंत्रण *  योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा. ✅ *6.मेंदूचे कार्य*  ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प...

दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते?पंचकर्म म्हणजे काय?

 योग्य आहार-विहार व व्यायाम असेल तर शरीरात दोष साठत नाही. पंचकर्माच्या मदतीने शरीरात साठलेली विषद्रव्ये, वाढलेले दोष, अनावश्‍यक किंवा मलरूप झालेले धातू काढून टाकता येतात हे खरे असले तरी मुळात असे का होते हे समजून घ्यायला हवे. आयुर्वेदिक विषयी माहिती-  किडनी स्टोन झाला असल्यास हे पदार्थ खाऊ नये हे पण वाचा  हिवाळ्यामध्ये लसुण का खावा? दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते? वात-पित्त-कफ हे तीन दोष शरीरातील मुख्य कार्यकारी तत्त्वे असतात, शरीराची इमारत यांच्यावर उभी राहिलेली असते. शरीरात काम करण्यासाठी ज्यावेळी जो दोष आवश्‍यक असतो, त्यावेळी तो अधिक कार्यक्षम होणे, प्रमाणाने वाढणे हे आपोआप घडत असते. उदा. रात्री झोप येण्यासाठी शरीरातील कफदोष वाढावा लागतो, दुपारी जेवणानंतर पचन व्यवस्थित व्हावे यासाठी पित्ताचा प्रभाव वाढणे आवश्‍यक असते, सकाळी मल-मूत्र विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी वातदोष वाढत असतो. वात-पित्त-कफाचे असे हे चक्र अविरतपणे चालू असते. शरीरातील सर्व tकार्ये व्यवस्थित चालू राहावीत हा यामागचा मूळ उद्देश असतो.  खाना खाने का सही तरिका - विडिओ देखे मात्र हा निसर्गक्रम ल...