Skip to main content

मूतखडय़ाचा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी- कोणते अन्नपदार्थ कमी प्रमाणात खावेत.

 खरंतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल.



किडनी स्टोन झालाय हे कसे ओळखाल? ही आहेत लक्षणे

खाण्यापिण्यातील अनियमीतता आणि आवश्यक तेवढं पाणी न पिणे हे किडनी स्टोन होण्याचं मुख्य कारण आहे. मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन अनेकांना होतो पण काहींच्या किडनीमध्ये तयार झालेला स्टोन सहज बाहेर पडतो. मात्र, काहींचा स्टोन मोठा असल्याने तो बाहेर पडण्यास अडचणी येतात. त्यामुळे काही लोकांना फार जास्त त्रास सहन करावा लागतो. खरंतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. जेणेकरुन वेळेवर उपचार घेऊन ही समस्या दूर करता येईल. चला जाणून घेऊया किडनी स्टोनचे काही संकेत. 


हे पण वाचा - जर आपले पोट 5 मिनिटात साफ झाले तर समजवे शरीर योग्य काम करत आहे

सुरुवातीला लघवीला वरचेवर जावे लागणे, लघवीला गेल्यावर थोडी जळजळ होणे असा त्रास रुग्णांना सुरू होतो. पण उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी कमी प्यायल्यामुळे त्रास होत असेल, एवढय़ा तेवढय़ासाठी कशाला उगाच डॉक्टरांकडे जा, असा विचार करून बरेचदा रुग्ण या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. मूतखडा असेल किंवा मूत्रमार्गाचे इन्फेक्शन असेल तर लघवीला जळजळ, वरचेवर जायला लागणे व किरकोळ दुखणे हे ‘वॉर्निग सिग्नल्स’ दिसू लागतात. पण रुग्णाला मूतखडा असेल, तर तो मूत्रनलिकेत अडकून रुतून बसू शकतो. यामुळे त्या भागात सूज येऊन मूत्रनलिकेतून खाली येणाऱ्या लघवीचा मार्ग बंद होतो. मूतखडा नैसर्गिक रीत्या बाहेर टाकून मूत्रमार्ग मोकळा करण्यासाठी मूत्रनलिकेतील स्नायू आकुंचन-प्रसरण पावून तो खडा पुढे ढकलून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला या मूत्रनलिकेच्या आकुंचन प्रसरणाचा जोर कमी असतो, तेव्हा दुखणेही सहन करण्यासारखे असते. मात्र थोडय़ा प्रयत्नाने खडा पुढे ढकलण्यात यश आले नाही, तर हीच आकुंचन-प्रसरणाची क्रिया अधिक वाढवली जाते. परिणामी पोटात जोरात कळा येऊ लागतात. कोणत्याही कारणाने पोटात तीव्र कळा येऊ लागल्या की उमासे येणे किंवा जोरात उलटी होणे ही प्रतिक्षिप्त क्रिया घडते.   

आता सोनोग्राफी तपासणी सुलभ झाल्यामुळे रुग्णाच्या मूतखडय़ाचा आकार, त्याचे स्थान आणि त्याच्यामुळे मूत्रनलिका तुंबली आहे का, हे पाहणे सोईचे झाले आहे. जेव्हा सोनोग्राफीची सोय नव्हती, तेव्हा काही प्रकारचे खडे एक्स-रे तपासणीत दिसत नसत. त्या वेळी रुग्णाच्या मूतखडय़ाच्या तपासणीसाठी एक प्रकारचा आयोडिनयुक्त डाय शिरेतून देऊन एक्स-रे काढले जात. काही रुग्णांना आयोडिनच्या डायची सिव्हियर रिअ‍ॅक्शन येण्याची भीती असे. आता सोनोग्राफीमुळे ही भीतीच दूर झाली आहे.

हे पण वाचून पहा - आपल्या जेवण करण्याच्या वेळा कश्या असाव्यात,

किडनी स्टोन होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पण जास्तीत जास्त ही समस्या खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे होते. मीठ आणि शरीरातील इतर खनिज जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा किडनी स्टोन होतो. याचा काही ठरलेला आकार नसतो. कधीकधी हे स्टोन लघवीच्या माध्यमातून बाहेत पडतात पण कधी कधी यामुळे होणाऱ्या वेदना सहस्य होतात. 


किडनी स्टोन झाला असता खालील पदार्थ खाऊ नयेत.


१) कोल्ड ड्रिंक्स, मांस, मासे खाऊ नये. फळांमध्ये स्ट्रॉबेरी, बोरं, अंजीर, किशमिश हे खाऊ नये. तसेच दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ जसे की, दही, पनीर, टॉफी, कॅन सूप, नूडल्स, तळलेले पदार्थ, जंक फूड, चिप्स आणि चहाचं जास्त सेवन करु नये.  


२) काही पदार्थांमध्ये ऑक्सलेट असतं जे किडनी स्टोन वाढण्यास कारणीभूत ठरतं. त्यात टोमॅटो, पालक, चवळी, द्राक्ष, सोयाबीन, सोया मिल्क, चीकू, काजू, चॉकलेट, उडीद, चणे, शेंगदाणे या पदार्थांचा समावेश आहे.



३) काही पदार्थांमध्ये किडनी स्टोन तयार करणारे यूरिक अॅसिड आणि प्यूरिनसारखे तत्त्व असतात. त्यामुळे किडनी स्टोन असताना मांस, मासे, वांगी, मशरुम, फ्लॉवर खाऊ नये. 


४) किडनी स्टोन असताना मीठाचं सेवन कमी प्रमाणात करावं. जास्त मीठामुळे लघवीमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण वाढतं. त्यामुळे भाजीमध्ये मीठ कमीच वापरा. त्यासोबतच वरुन मीठ घेणे टाळा.


५) कॅल्शिअम कमी प्रमाणात घेतलेलं बरं होईल. कारण कॅल्शिअम आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. पण किडनी स्टोन असताना जास्त कॅल्शिअममुळे समस्या वाढू शकते. त्यामुळे कमी प्रमाणात कॅल्शिअम घ्यावं. 

हे पण वाचा -मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे

६) कि़डनी स्टोन झाला असताना कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक अजिबात सेवन करु नये. कारण हे तयार करण्यासाठी फॉस्फोरिक अॅसिडचा वापर होतो. त्यामुळे किडनी स्टोन असताना यांचं सेवन टाळावे. 


७) अल्कोहोलमध्ये प्यूरीन अॅसिड आढळतं. जे किडनी स्टोन तयार होण्यास मदत करतं. त्यामुळे किडनी स्टोन असताना मद्यपान करु नये.

जर मूतखडा छोटा असेल, तर तो आपणहूनच लघवीवाटे पडून जाण्याची शक्यता अधिक असते. असे अंदाजे ८० टक्के छोटे खडे आपल्याला कसलीही जाणीव न देता पडून जातात. आपल्याला त्यांचा त्रास तर होत नाहीच, पण मूतखडा पडून गेल्याचे जाणवतही नाही. ! हे मूतखडे जाणीव देतात, पण नंतर लघवीवाटे पडून जातात. मूतखडा पडून जाण्याच्या प्रक्रियेत वेदना होत असल्यास त्या कमी होण्यासाठी औषधांचा उपयोग होऊ शकतो. मात्र खडा विरघळणे किंवा पडून जाणे हे निसर्गत: घडते. खूप पाणी पिण्याचा यासाठी उपयोग होऊ शकतो. खडा पडून जावा म्हणून काही रुग्ण चक्क बिअर पितात! पण लघवी जास्त व्हावी आणि त्याच्या जोराने मूतखडा पडून जावा हा उद्देश अधिक पाणी पिण्यानेही साधतो. त्यामुळे बिअर पिण्यासाठी मूतखडय़ाचे निमित्त सांगण्याची आवश्यकता नाही. उलट कोणत्याही प्रकारचे मद्यपान टाळलेलेच उत्तम.   

थोडी वाट पाहून, भरपूर पाणी पिऊनही खडा पडलाच नाही व दुखण्याचा त्रास कमी झाला नाही, तर त्यांचा किडन्यांवर परिणाम होण्याची शक्यता उद्भवते. अशा वेळी वैद्यकीय तज्ज्ञ दुर्बिणीच्या साहाय्याने किंवा ‘साउंड वेव्हज’च्या यंत्राद्वारे असे खडे फोडतात. खडय़ांचा चुरा झाल्याने ते बाहेर पडण्यास मदत होते. खडे खूप मोठे असतील, तर दुर्बिणीने शस्त्रक्रिया करून काढावेही

लागू शकतात.

मूतखडय़ाचा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी-

 मूतखडय़ातील बरेच खडे ‘ऑग्झॉलेट स्टोन्स’ असतात. ऑग्झ्ॉलेट हे एक प्रकारचे क्षार असतात. त्यामुळे ज्या पदार्थात ऑग्झ्ॉलेटचे प्रमाण जास्त, असे अन्नपदार्थ कमी प्रमाणात खावेत. पालक, टोमॅटो, कांदा, लसूण, आळूची भाजी कमी प्रमाणात खावे. नेहमीच जास्त पाणी पिणे चांगले. त्यामुळे परत मूतखडा होण्याची शक्यता कमी होऊ शकेल. पण याचा अर्थ मूतखडा एकदा होऊन गेल्यावर पुन्हा होणारच नाही असेही नाही. मूत्रमार्गाचे इन्फेक्शन आणि मूत्रमार्गातील अडथळ्यांवर वेळीच उपचार करून मूतखडा होण्याची शक्यता कमी करता येते.

अन्नातून लहान दगड किंवा खडे खाल्ले गेले, वांगी, भेंडी यांसारख्या बिया असलेल्या भाज्या खाण्यात आल्या, तर मूतखडय़ाचा त्रास उद्भवतो असा काही जणांचा समज असतो. तो खरा नव्हे. अगदी वाळू जरी खाल्ली गेली तरी ती किडनीपर्यंत पोहोचू शकत नाही! विष्ठेतून पडून जाते. त्यामुळे हा समज चुकीचा आहे.

सरुवातीचे लक्षणे



किडनी स्टोनमुळे पाठीच्या खालच्या भागात फार जास्त वेदना होतात. हा त्रास काही तास किंवा काही मिनिटांसाठीही होऊ शकतो. यात वेदना होण्यासोबतच जीव मळमळणे किंवा ओमेटींगही होऊ शकते. खूप जास्त घाम येणे, लघवी करताना त्रास होणे असेही प्राथमिक लक्षणे आहेत. 


लघवीतून रक्त


किडनी स्टोनची समस्या असणाऱ्या लोकांना नेहमी गुलाबी, लाल रंगाची लघवी येऊ लागते. आणि स्टोनचा आकार वाढल्याने मूत्रमार्ग ब्लॉग होतो. किडनी स्टोन झालेल्या लोकांच्या लघवीतून कधी कधी रक्तही येतं. 


सतत लघवीला जावे लागणे


किडनी स्टोनने ग्रस्त लोकांना सतत त्रास होण्यासोबत लघवीला जावं लागतं. असं किडनी स्टोन मूत्रमार्गातून मूत्राशयात गेल्यावर होतं. ही गोष्ट फारच त्रासदायक असते. यामुळे असह्य असा त्रास होतो. 


पाठदुखी


तीव्र वेदना होणं ही कि़डनी स्टोनने ग्रस्त लोकांसाठी सामान्य बाब आहे. खासकरुन कंबर आणि कबंरेखालील भागात खूप जास्त असह्य वेदना होतात. या वेदना काही मिनिटांसाठी किंवा काही तासांसाठीही होऊ शकतात. 


मळमळ होणे आणि ओमेटींग


पोटात कसंतरी होणे आणि मळमळ होणे हे किडनी स्टोनचे सुरुवातीचे संकेत आहेत. अनेकदा ओमेटींगही होते. 


लघवीतून दुर्गंधी येणे


किडनी स्टोन झाल्यास लघवीचा रंग लालसर येतो आणि दुर्गंधीही येते. 


बसल्यावर वेदना होणे


किडनी स्टोन वाढल्याने त्या भागात वेदना होऊ लागतात. त्यामुळे त्या लोकांना बसायला त्रास होतो. इतकेच काय तर ते कधी कधी आरामात झोपूही शकत नाही. 


ताप येणे आणि थंडी लागणे


किडनी स्टोनमुळे अनेकदा ताप येणे, थंडी वाजणे या समस्याही होतात. अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 


किडनी आणि पोटावर सूज येणे


मोठ्या आकाराचे स्टोन हे मूत्रमार्ग ब्लॉक करतात. त्यामुळे किडनीवर वेदना देणारी सूज येते. त्यासोबतच पोट आणि कंबरेच्या भागातही सूज येते.



सोनोग्राफी केली तर आजही आपल्या मूत्रपिंडात दोन मिलीमीटर आकारापर्यंतचे खडे आढळतील. अनेकदा आपल्या नकळत हे खडे बाहेर निघून जातात. अथवा विरघळून जातात. मात्र, या खड्यांचा आकार जेव्हा वाढतो तेव्हा अन्य गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे मुतखड्यांचा वेळेत उपचार करून घेणे अत्यावश्यक आहे.


...मुतखडे का होतात?

मूत्रपिंडे आपल्या शरीरात रक्तशुद्धीचे कार्य करीत असतात. जेवणाद्वारे सेवन करीत असलेले अनेक पदार्थ मूत्रपिंडातून सतत फिल्टर होत असतात. त्यामध्ये कॅल्शियमसारखा क्षारदेखील असतो. या फिल्टरदरम्यान क्षारांचे प्रमाण वाढल्याने ते मूत्रपिंडात साचून हळूहळू खडे तयार होतात. प्रमाणात पाणी प्यायल्याने ते लघवीवाटे गळून जातात. मात्र, पाणी कमी पिण्यात येत असेल, क्षारयुक्त पदार्थांचे आहारात प्रमाण अधिक असल्यास, आतडे आदींची शस्त्रक्रिया झाली असेल तर मुतखडे बनण्याची शक्यता अधिक असते.


(Health Care Tips पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथींचा त्रास)

-मुतखड्यांचा आकार आणि वेदना

मुतखड्याचा आकार हा सरासरी चार मिलीमीटर ते चार सेंटीमीटरपर्यंत असू शकतो. अलिकडे सात सेंटीमीटर म्हणजे एका छोट्या वाटी एवढा मुतखडा बाहेर काढला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की, मुतखड्यादरम्यान होणाऱ्या वेदना या मुतखड्याच्या आकारावर अवलंबून नसतात. मोठा मुतखडा म्हणजे अधिक वेदना असे समीकरण नसते. याउलट लहान खडे अनेकदा अधिक वेदना आणि गुंतागूंत निर्माण करू शकतात. त्यामुळे मुतखडा मोठा आहे की छोटा, यापेक्षा तो खडा कुठल्या भागात आहे; यावर वेदना व गुंतागूंत अवलंबून असते.


धोका कुणाला..?


- उच्चरक्तदाब अथवा मधुमेहग्रस्त रुग्णांना मुतखडा बनण्याची शक्यता अधिक असते.

- जेवणात एकच पदार्थ वारंवार येत असेल; जसे अत्याधिक मांसाहार, गरजेहून अधिक प्रथिनांचे (प्रोटिन) सेवन

-हॉर्स शू किडनी, मालरोटेटेड किडनी (जन्मतः उलटे मूत्रपिंड), मूत्रपिंडातील नस जाम होणे अथवा मूत्रपिंडाचे अनुवांशिक विकार असलेल्यांना

- वारंवार लघवीचे संसर्ग होत असल्यास


- आतड्यांच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना

- वैद्यकीय सल्ल्याशिवाय कॅल्शियम औषधांचे सेवन केल्याने

-लठ्ठपणामुळे, किंवा जलद वजन कमी केल्याने

- प्रथिनांचे अनियमित सेवन करणारे; डाएट फॅडमुळे


किडनी स्टोनपासून दूर राहण्याचे उपाय

1. आहारात प्रोटीन, नायट्रोजन तसेच सोडियमचे प्रमाण कमी असावे.


2. चॉकलेट, सोयाबीन, पालक याचे जास्त सेवन करू नये.


3. गरजेपेक्षा जास्त कोल्ड्रिंकचे सेवन नुकसानदायक ठरू शकते.

हे पण वाचा - किडनी साफ करणे का अचूक इलाज

4. व्हिटॅमिन-सी जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करावे


5. फळांचे ज्यूस (रस) जास्त प्रमाणात घेतल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका कमी राहतो.

Comments

Popular posts from this blog

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी? लसूण चे फायदे

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी*? लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. लसूण अन्नाचा स्वाद वाढवते. पण याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहे. आयुर्वेदात देखील लसणीचे महत्व सांगितले आहे. कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा.  कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे. लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते. हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.  लसणीमधील पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च ...

वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम

 *वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम*  खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे. ♦ *हे आहेत दुष्परिणाम* ♦ ✅ 1. *वजन वाढते*  वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते. यामु फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. ✅ *2. चक्कर येणे*   भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते. ✅ *3. तणाव *  भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो. 22 ✅ *4. अन्य आजार *  वजन घटवायचे असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतराने खात राहा. अन्यथा विविध आजार शरीरात शिरकाव करू शकतात. ✅ *5. लठ्ठपणावर नियंत्रण *  योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा. ✅ *6.मेंदूचे कार्य*  ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प...

दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते?पंचकर्म म्हणजे काय?

 योग्य आहार-विहार व व्यायाम असेल तर शरीरात दोष साठत नाही. पंचकर्माच्या मदतीने शरीरात साठलेली विषद्रव्ये, वाढलेले दोष, अनावश्‍यक किंवा मलरूप झालेले धातू काढून टाकता येतात हे खरे असले तरी मुळात असे का होते हे समजून घ्यायला हवे. आयुर्वेदिक विषयी माहिती-  किडनी स्टोन झाला असल्यास हे पदार्थ खाऊ नये हे पण वाचा  हिवाळ्यामध्ये लसुण का खावा? दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते? वात-पित्त-कफ हे तीन दोष शरीरातील मुख्य कार्यकारी तत्त्वे असतात, शरीराची इमारत यांच्यावर उभी राहिलेली असते. शरीरात काम करण्यासाठी ज्यावेळी जो दोष आवश्‍यक असतो, त्यावेळी तो अधिक कार्यक्षम होणे, प्रमाणाने वाढणे हे आपोआप घडत असते. उदा. रात्री झोप येण्यासाठी शरीरातील कफदोष वाढावा लागतो, दुपारी जेवणानंतर पचन व्यवस्थित व्हावे यासाठी पित्ताचा प्रभाव वाढणे आवश्‍यक असते, सकाळी मल-मूत्र विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी वातदोष वाढत असतो. वात-पित्त-कफाचे असे हे चक्र अविरतपणे चालू असते. शरीरातील सर्व tकार्ये व्यवस्थित चालू राहावीत हा यामागचा मूळ उद्देश असतो.  खाना खाने का सही तरिका - विडिओ देखे मात्र हा निसर्गक्रम ल...