हिवाळ्यामध्ये तुरीचे कोवळे दाणेही बाजारात यायला लागतात. मिसळीच्या भाजीत तर हे घालतोच आपण पण या दाण्यांची आमटी फार खमंग लागते. त्यामुळे बाजारात हे दाणे दिसले की माझ्या तोंडाला पाणी सुटतं. या मोसमातले पहिले तुरीचे दाणे मला परवाच मंडईत मिळाले. म्हणून लगेचच त्यांची आमटी केली. आजची रेसिपी आहे तुरीच्या दाण्यांची भाजी किंवा तुम्ही त्याला आमटी असे सुद्धा म्हणू शकता. साहित्य – १ वाटी सोललेले तुरीचे दाणे, १ मोठा कांदा लांब पातळ चिरलेला, २ टीस्पून ओलं खोबरं, १ हिरवी मिरची, २ लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून लाल तिखट, २ टीस्पून काळा मसाला, मीठ चवीनुसार, २ टीस्पून दाण्याचं कूट (ऐच्छिक), १ टेबलस्पून तेल, ७-८ कढीपत्त्याची पानं, थोडी मोहरी, पाव टीस्पून हिंग कृती – १) एका कढईत थोडंसं तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात कांदा, लसूण आणि मिरची घाला. मध्यम आचेवर चांगलं परता. २) कांदा लालसर व्हायला लागला की त्यात तुरीचे दाणे घाला. नीट हलवा आणि झाकण घालून मंद आचेवर ठेवा. मधूनमधून हलवत रहा. ३) तुरीचे दाणे शिजत आले की ओलं खोबरं घाला आणि परता. ४) दोन मिनिटं परतून त्यात कोथिंबी...
.. भाकरि.. एक संतुलित पौष्टिक. , पचनास सुलभ असा अन्नघटकः "बाजरिः"। हिवाळ्यात आपण ऊष्ण पदार्थ उर्जा निर्माण करण्यास खातो. त्यामुळे बाजरिचि भाकरि, तिळकुट, वांग्याचि भाजि, असा आहार घेतो. बाजरि.प्रक्रुतिने उष्ण, पचायला हलकि, रूचकर, व पौष्टिक असते. यात कर्बोदके, प्रथिने व तंतूमय पदार्थांचे योग्य प्रमाण असते. बाजरिचि भाकरी त फोलिक अँसिड, कँलशिअम, लोह, पोटँशिअम, मँग्नेशिअम सारखि जीवनसत्वे व खनिजे असतात. बाजरि खाल्याने स्रियांमध्ये मासिक पाळी नियमित येते, व प्रसूति व बाळंतपणात दूध भरपूर येते. बाजरीच्या भाकरि जेवणाचे समाधान मिळतं, लवकर भूक लागत नाही, वजन नियंत्रित ठेवल्याजाते. बाजरिचि भाकरि नियमित खाल्यास मानसिक ताण कमी होतो. व रात्रि झोप शांत लागते. म्हणूनच हिवाळ्यात बाजरिचि भाकरी नियमित खावि. त्याबरोबर तिळाचि चटणि व पालेभाजि खावि. ##ज्वारिः। ज्वारि तुलनेने शीत गुणाचि, पचायला हलकि असते. यात कर्बोदके, प्रथिने, व फायबर असतं. हि उर्जादायि असते. पोटाला गुणकारि आसते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. यातिल अँटिआँक्सिडेंटमूळे लठ्ठपणा, रक्तातिल कोलेस्ट्रोलचि...